Categories: आरोग्य

दररोज ‘खजूर’ खाणे किती गरजेचे आहे, एकदा अवश्य वाचा!

जगभरात जवळपास तीस प्रकारचे खजूर पहायला मिळतात. हे सर्वप्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. खजुरात ‘अ’, ‘ब’, ‘क’ जीवनसत्व आणि लोह असते. आपल्या शरीराला रोजची गरजेची असलेली पोषकतत्वे मिळत असल्याने खजूराला पूर्ण अन्न म्हटले जाते. त्यामुळे खजूर शक्तीवर्धक, अशक्तपणा कमी करणारं आणि शरीराला ऊर्जा देणारं फळ आहे. खजूर खाल्ल्यास तुम्हाला तात्काळ उर्जा मिळते. आयुर्वेदानुसार खजूर शक्तीवर्धक, पौष्टिक, श्रमहारक आणि वीर्यवर्धक फळ आहे. 

खजूर उष्ण हवामानात व प्रदेशात तयार होतो.  ताज्या आणि पिकलेल्या फळाला खजूर असं म्हणतात तर त्याच्या सुकवलेल्या फळाला खारीक असं म्हणतात. भारतात रेताड जमिनीमध्ये खजूराची झाडं सहज उगवतात असे असले तरी खजूराची झाडे सौदी अरेबिया, इराक, अफगाणिस्तान या वाळवंटी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळतात. खजूर पचायला हलका असल्याने खाल्ल्यावर तो जशाचा तसा पूर्णपणे आतड्यांनी ग्रहण केला जातो. खजूर वात व पित्तशामक कार्य करतो. वजन वाढवतो. शरीराला तृप्ती आणतो. म्हातारपणा दूर ठेवतो. ज्यांना दिर्घायुष्य हवे आहे त्यांनी खजूर नियमितपणे खावा. खजूर तुपाबरोबर घेतल्यास त्याचे गुण वाढतात. वाढलेल्या पांथरीवर खजूर उपयोगी पडतो. खजुराच्या चार बियांचा गर कुस्करून पाण्याबरोबर नियमितपणे महिनाभर खावा. पांथरी कमी होते. खजूर सारक आहे. त्यामुळे पोट साफ होते. त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात. कांती सुधारते, रक्त वाढते. नियमित दोन खजूर खाणे सुरू केल्यास त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो.

तृषार्त किंवा खूप शोष पडणाऱ्यांनी खजुराच्या दोन-चार बियांचा मगज थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवून ते पेय घ्यावे. वृद्ध व लहान कृश बालकांकरिता दोन खजूर, चिमूटभर जिरे व चवीला गूळ किंवा साखर असे मिश्रणाचे सरबत मिक्सरमध्ये करावे. खजुराचा विशेष फायदा, मेंदू, हृदय, कंबर, वृक्क या अवयवांना बल देण्यात होतो. तापातून उठलेल्यांकरिता खर्जूरमंथ किंवा रवीने घुसळून तयार केलेले खजुराचे सरबत फार चांगले गुण देते. अतिकृश बालकांना वजन वाढवायला खजुराचा उपयोग होतो. 

महत्त्वाचे – खजूर खाण्याअगोदर त्याचा दर्जा बघूनच तो खाणे गरजेचे आहे. खजूर परदेशातून आयात होत असल्याने आयात करताना तो अतिशय अस्वच्छ पध्दतीने हाताळला जातो. त्यामुळे खजूर गरम पाण्याने स्वच्छ धुऊन मगच खावा.

 • फायदे –
 • खजुरामध्ये फायबर (तंतूमय पदार्थ), लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे हिवाळ्यात शरीराला उबदारपणा मिळतो.
 • दररोज सकाळी गरम दुधासोबत खजुराचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
 • दोन-तीन खजूर, थोडी काळीमिरी आणि वेलची पावडर हे मिश्रण गरम पाण्यात उकळा. हे मिश्रण रात्री झोपण्याच्या आधी प्यावे.
 • खजुरामध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) असते. त्यामुळे पचनक्रिया उत्तम रहाते.
 • खजूर खाल्ल्याने कफ कमी होतो. पोटाचे आजार कमी होतात. म्हणून हिवाळ्यात रोज खजूर फायदेशीर.
 • बदलत्या हवामानामुळे अनेक लोकांना संधिवाताचा त्रास होतो. तज्ज्ञांच्या मते खजुरामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात. हिवाळ्यात खजूर सेवन केल्याने संधिवाताच्या वेदना कमी होतात.
 • हिवाळ्यात अनेक लोकांमध्ये दम्याचे प्रमाण वाढते. सकाळी एक-दोन खजूर खाल्यामुळे शरीरात उष्णता वाढते.
 • खजुरात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होते. ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी दररोज ५-६ खजुराचे सेवन करावे.
 • हिवाळ्यात रोज खजूर खाल्ल्याने हृदयाचे ठोके सामान्य राहतात. हार्ट अटॅकची येण्याची शक्यता कमी होते.
 • खजुरातील फायबरमुळे शरीरात असलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी होते.
 • डोळ्यांच्या समस्या असल्यास किंवा डोळे कमकुवत असतील तर खजूर खाणे आवश्यक.
 • रातांधळेपणा देखील दूर होण्यास मदत होते.
 • कॅल्शियमचा सर्वोत्तम स्रोत असल्याने रोज खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
 • सर्दीने त्रस्त असाल तर खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून सेवन करा. सर्दी लवकर बरी होईल.
 • नुकसान –
 • खजूरामुळे शरीरात रक्तातील साखर वाढू शकते, त्यामुळे ते अतिप्रमाणात खाऊ नका.
 • ज्यांना मधुमेह आहे त्यांनी फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खजूर खावे.
 • आपले वजन जास्त असेल तर खजूर खाणे टाळा, यामुळे वजन वाढू शकते.
 • जास्त खजूर खाल्ल्याने पोटदुखी किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते. काहींना अतिसारही होतो.
 • काही लोकांना याची एलर्जी देखील असू शकते.

पुरूषांसाठी महत्वाचे – खारीक पुरुषांमधील नपुंसकता दूर करण्याचा रामबाण उपाय आहे. तीन महिने सलग खारीक खाल्ल्यास नपुंसकतेची समस्या दूर होऊ शकते. दररोज रिकाम्या पोटी खारीक खावी. पहिल्या आठवड्यात एक खारीक आणि दुसर्‍या आठवड्यापासून पुढील दोन आठवडे दोन खारका दररोज चावून-चावून खाव्यात. तिसर्‍या आठवड्यात तीन खारका खाव्यात आणि चौथ्या आठवड्यापासून १२ व्या आठवड्यापर्यंत चार-चार खारकांचे दररोज सेवन करावे. नपुंसकतेची समस्येत आश्चर्यकारक लाभ मिळतो.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: life insurance medical insurance ओली खजूर खाण्याचे फायदे काळी खारीक खाण्याचे फायदे खजूर और दूध के फायदे खजूर खाण्याचे नुकसान खजूर खाने के फायदे खारीक खाण्याचे फायदे