नागपूर | कंगना राणावतने मुंबई पोलिसांची बदनामी केलीय. आमचे पोलीस अधिकारी तिच्या विधानाची पाहणी करून योग्य तो निर्णय घेतील. मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांना महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने आपल्या ट्विटमध्ये म्हणटले होते की, मला मुंबई पोलीसांची भीती वाटते आणि मुंबईत पाक व्याप्त काश्मीर सारखे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी कंगनाचे नाव न घेता, मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मुंबईत राहण्याचा हक्क नाही अशी प्रतिक्रिया दिली. आमच्या मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड पोलिसांसोबत केली जाते. पण काही लोक मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यावर मुंबई पोलीस योग्य ती कारवाई करतील असेही गृहमंत्री देशमुख यांनी आज नागपुरात सांगितले.
तर मी पोकळ धमक्या देत नाही, थेट कृती करतो –
दरम्यान, मुंबई पोलिसांचा अपमान करणाऱ्या आणि मुंबईला पाकव्याप्त मुंबई म्हणणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी झापले असून, मी पोकळ धमक्या देत नाही, थेट कृती करतो असा सज्जड दम दिला आहे.