यापूर्वी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून शेतकरी फक्त पशुपालनाचा व्यवसाय करायचा. मात्र आता पशुपालनासह मत्स्य पालन, मधुमक्षिका पालन यासारखे शेती पुरक जोडव्यवसाय करून आपल्या आर्थिक उत्पन्नात भर घालत आहेत. मधमाशी पालन हा देखील सध्याच्या घडीला शेतकरी वर्गात लोकप्रिय होत असलेला आणि चांगली कमाई करून देणारा जोडव्यवसाय आहे. राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमांतर्गत मधमाशीपालन हा लघुउद्योग श्रेणीत असून मधुमक्षिका पालन व्यवसाय करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना तब्बल ५० टक्के अनुदानही देत आहे. त्यामुळेच आज आम्ही आपल्याला याविषयी माहिती देत आहोत.
मधुमक्षिकापालनामधून मधाबरोबर आणखी एक दुय्यम उत्पादन मिळते, ज्याची मार्केटमध्ये खूप मागणी आहे आणि ते म्हणजे मेण, ज्यापासून मेणबत्ती तयार करतात. म्हणजे व्यवसाय एक आहे पण त्याचे फायदे अनेक आहेत. नवोदित व्यावसायिकांना ही एक सुवर्णसंधी आहे, कमी गुंतवणूक करून व कमी कालावधीत भरपूर उत्पन्न कमवू शकतात. आपल्याला मध शेती करायची असेल तर आपल्याला मोठ्या व मोकळ्या जागेची गरज असते. जर तुम्हाला २००-२५० पेट्या ठेवायच्या असतील तर साधारण ४५०० स्केअर फूट जागेची गरज लागेल. आपण आपल्या शेतात ही ठिकठिकाणी या मध पेट्या ठेवू शकतो.
मधुमक्षिका पालन करताना एक गोष्ट लक्षात ठेवावे लागते, ती म्हणजे मधमाशी कोणती घ्यायची याची माहिती जाणकरांकडून घ्यावी. भारतामध्ये मधमाशाच्या चार प्रजाती आहेत. दगडी माशी अपीस डोरसाटा- या माशा उत्तम प्रकारे मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन ५०-८० किलो असते. लहान माशी अपीस फ्लोरिआ – या माशा कमी मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे अंदाजे २००-९०० ग्रॅम मध मिळतो. भारतीय मधमाशी अपीस सेराना इंडीका – या मधमाशांद्वारे होणारं मध उत्पादन दर वर्षी प्रति वसाहत ६-८ किलो असते. युरोपिअन मधमाशी इटालिअन मधमाशी अपीस मेल्लीफेरा यांच दर वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन २५-४० किलो असते.
मधुमक्षिका पालनासाठी मधमाशी बरोबर पेटीची आवश्यकता असते. एका पेटीची किंमत ही सुमारे ३५०० असते. या पेटीत एकूण दहा फ्रेम असतात. तर एका फ्रेम मध्ये २५० ते ३०० माशा राहतात. माशीची निवड केल्यानंतर पेट्या योग्य ठिकाणी ठेवाव्यात. कालांतराने माशा मध पेटीत साठवण्यास सुरुवात करतात. मधाचे पोळे मधाने भरल्यानंतर ते योग्य पद्धतीने चाकूने कापून घ्यावे. त्यानंतर कापून घेतलेला भाग यंत्रात टाकावा. यंत्र सुरू झाल्यावर मध बाजूला होऊन नको असलेला भाग वेगळा होईल.
एका फ्रेम मधून साधारण २०० ग्रॅम एवढा मध मिळतो. म्हणजे एका पेटीतून २ किलो मध आपल्याला प्राप्त होत असते. एका पेटीतून आपण महिन्याला ४ किलो मध काढू शकतो. हा मध आपणाला जनरल स्टोअर्स आणि किराणा स्टोअर मध्ये विकता येते. तसेच मध उत्पादन करणाऱ्या कपन्यांशी संलग्न राहून आपण त्यांनाही मध विकू शकतो. याला सरासरी १०० रुपये किलो इतका भाव मिळतो. अशा प्रकारे आपण एका महिन्याला १,१५,००० रुपये किंमतीचे मध विकू शकतो.
मधाचेफायदे –
मधशेतीकरतानाघ्याचीकाळजी
मध शेती करताना पेट्या या खुल्या जागेत ठेवाव्यात. त्यामुळे माशांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येऊ शकते. तसेच मधमाश्यांना त्रास दिल्यास त्या चावतात त्यामुळे त्यांनी चावा घेतल्यास योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. दरम्यान मधमाशी पालनासाठी प्रशिक्षण जर घ्यायचे असेल तर भारत सरकारच्या सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये जाऊ शकता तसेच http://nbb.gov.in या संकेस्थळावरील माहिती पाहू शकता.
मधाच्या पोळ्याची स्थापना कुठे कराल
पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत मध उत्पादन केंद्र उभारावे. फळबागांच्या जवळ मकरंद, परागकण आणि भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी उभारणी करावी. पोळ्याचे तापमान आवश्यक तितके राहण्यासाठी सूर्यप्रकाशापासून मधमाशांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. मधमाशा पेटीत ठेवतांना चारही पायाखाली पाण्याने भरलेली वाटी अॅन्टवेल्स ठेवावी, जेणेकरून पेटीत मुंग्या जाणार नाहीत. वसाहतींना पाळीव जनावर, अन्य प्राणी, गर्दीचे रस्ते, इलेक्ट्रीक पोल पासून दूर ठेवावे.
काही दिवसांपुर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेती आणि शेतीला पुरक असलेल्या व्यवसायांना आर्थिक मदत जाहीर केली. त्याता मधुमक्षिका पालनासाठीही सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यासह आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे अत्यंत विषारी कीटकनाशकांवर सरकारने बंदी घातली आहे. या कीटकनाशकांचा मधमाशांवर विपरित परिणाम होत होता. त्यामुळे औषधांवरील बंदीमुळे मधमाशांचे कार्य अधिक चांगले होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल.