Categories: Featured कृषी

१००% सरकारी अनुदानातून करा फळबाग लागवड; ‘या’ आहेत योजना आणि त्यासाठीची पात्रता!

मुंबई | अनेक शेतकरी पांरपारिक शेतीकडून फळबाग शेतीकडे वळत आहेत. फळ बागांमुळे शेतकऱ्यांना स्थायी स्वरूपाचे कमाई साधन मिळत आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारही फळबाग शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसेही शेतकऱ्यांनी फळबागांचे क्षेत्र वाढवावे यासाठी आग्रही आहेत. सरकारी पातळीवर फळबाग लागवडीस प्रोत्साहन म्हणून सरकारकडून आर्थिक मदत केली जात आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिले जात असून यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडत आहे.

फळबाग लागवड योजनेसाठी पात्रता – 
* शेतकऱ्याच्या नावे स्वतःचा सातबारा असणे आवश्यक .
* जर सात बारा उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक.
* जर सातबाऱ्यावर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक.
* ज्या शेतकऱ्यांची कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर चालू असेल अशांना प्रथम प्राधान्य त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल.

क्षेत्र मर्यादा
* किमान 0.20 हे. व कमाल 6.00 हेक्टर पर्यंत लाभ घेता येतो.
* या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारचे शंभर टक्के अनुदान आहे.
* हे अनुदान तीन वर्षाच्या कालावधीत दिले जाते.
* अनुदान मिळताना पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के, तिसऱ्या वर्षी 20 टक्के याप्रमाणे अनुदान देय आहे. दरम्यान या योजनेसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागतो.

लागवड कालावधी
* या योजने अंतर्गत फळबाग लागवड कालावधी हा जून ते मार्च आहे.
* या योजनेनुसार शेतकऱ्याला त्यांच्या आवश्यकतेनुसार सर्व फळपिकांच्या कलम रोपांची लागवड करता येईल.
* फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ रोपवाटिका, राष्ट्रीय बागवानी मंडळ मार्फत मानांकित खाजगी रोपवाटिका तसेच कृषी विभागाच्या परवानाधारक रोपवाटिकेतून कलम रोपे खरेदी करता येतील.
* शेतकऱ्यांनी त्यांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर फळबाग लागवड करावी.

प्रति हेक्‍टरी लागवड अंतर व त्यासाठी मिळणारे अनुदान 
* आंबा कलम (10 बाय10मी.)- 53 हजार 900 रुपये
* पेरू कलमे (6 बाइ 6 मी.)= 62 हजार 472 रुपये
* संत्रा, मोसंबी व कागदी लिंबू कलम (6बाइ 6मी.) = 62 हजार 578 रुपये
* सिताफळ कलम(5 बाइ 5 मी.) = 72 हजार 798 रुपये
* चिकू कलमे = 55 हजार 355 रुपये.

जे शेतकरी मनरेगासाठी पात्र नाहीत अशा शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून लाभ दिला जातो.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Employment Guarantee Scheme Horticulture Plantation Employment Guarantee Scheme Horticulture Plantation 2020 Horticulture Cultivation Methods Plan Horticulture Plantation Horticulture Plantation Grant 2020 Horticulture Plantation Scheme 2020 Horticulture Program Related to Employment Guarantee Scheme MGNREGA Horticulture Plantation फळबाग लागवड फळबाग लागवड अनुदान 2020 फळबाग लागवड पद्धती फळबाग लागवड योजना 2020 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना मनरेगा फळबाग लागवड योजना मिश्र फळबाग लागवड रोजगार हमी योजना फळबाग लागवड 2020 रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम