Categories: Featured

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी ‘हे’ आहेत सोपे उपाय

मुंबई। जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने भारतीयांची देखील झोप उडवली आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत असून आरोग्ययंत्रणा युध्दपातळीवर कार्यरत झाल्या आहेत. या रोगाने एकट्या चीनमध्ये साडे तीन हजार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय जगभरात दीड लाखापेक्षा जास्त लोकांना यामुळे बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना आता महाराष्ट्रातही धडकला असून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ५ वर पोहचली आहे. कोरोना व्हायरसवर अद्यापही ठोस उपाय शोधला गेलेला नाही. त्यासाठी कोणत्याही अधिकृत उपचार पध्दतीचा शोध लागलेला नाही. परंतु या रोगाचा प्रतिबंध करणे मात्र शक्य आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दक्षतेचे काही उपाय सुचविण्यात आले आहेत.

 • कोरोना व्हायरस रोखण्यासाठी हे आहेत सोपे उपाय
 • 1. नियमित हात धुवा – दिवसातून जास्तीत जास्त वेळा साबणाने नियमितपणे हात धुवा. यामुळे हातावरील विषाणूंच्या प्रतिबंधासाठी ते उपयोगी ठरतं.
 • 2. सुरक्षित अंतर राखा – आपल्या आसपासच्या लोकांमध्ये किमान ३ फूट अंतर ठेवा. विशेषतः ज्यांना सर्दी खोकला असेल अशा लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
 • 3. नाक, तोंड, डोळ्यांना वारंवार हात लावू नका – आपण अनेक वस्तूंना स्पर्श करीत असतो. ज्यामुळे आपल्या हातावर बॅक्टेरिया असतात. वारंवार नाक, तोंड, डोळ्यांना हात लावल्याने हातावरील विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात.
 • 4. शिंकताना रुमालाचा वापर करा – शिंकल्यानंतर नाका-तोंडातून निघणाऱ्या तरल पदार्थांमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात. त्यामुळे शिंकताना नाका-तोंडावर रुमाल किंवा टिश्यू धरा.
 • 5. सर्दी, ताप, खोकल्याकडे दुर्लक्ष करु नका – जर तुम्हाला ताप, सर्दी असेल किंवा श्वसनास त्रास होत असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. तसेच अशा वेळी घरातच थांबा.
 • 6. मोबाईलची स्क्रीन स्वच्छ ठेवा – आठवड्यातून एकदा तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला डिसइन्फेटिंग वाइप्सने साफ करा. या वाइप्समुळे मोबाईलच्या वरील भागावरील किटाणू मरतात.
 • 7. बाथरुम स्वच्छ ठेवा – बाथरुमची स्वच्छता करताना शॉवर डेटॉलसारख्या औषधी द्रव्याने जरुर स्वच्छ करा. प्लास्टिकच्या पडद्यांचा वापर बाथरुममध्ये करु नका.
 • 8. विमान प्रवासात काळजी घ्या – विमान प्रवासात स्वच्छ हात धुतल्यानंतरच विमानसेवेच्या कर्मचाऱ्यांच्या हातून खाद्यपदार्थ घ्या. कारण विमान प्रवासात विमान कर्मचाऱ्यांमार्फत कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
 • 9. प्रवास टाळा – कोरोना व्हायरसची लागण टाळण्यासाठी शक्यतो लांबचा प्रवास टाळा. त्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे.
 • 10. मास्क वापरा – सर्दी, खोकला झाल्यास आपला संसर्ग इतरांना होऊ नये यासाठी डॉक्टरी सल्ल्याने योग्य तेच मास्क वापरा. घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी योग्य मास्कचा, योग्य प्रकारे वापर करा.
 • 11. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा – कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. तो प्रचंड वेगाने पसरत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी न जाणं टाळा.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Beijing buy insurance china Corona Corona virus get online insurance health insurance how to prevent from corona virus Insurance medical insurance personal insurance Rumors on Coronavirus