Categories: आरोग्य

Corona Virus: कोव्हिड-19 ची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?

कोरोना विषाणूच्या फैलावाविषयी अधिकाधिक संशोधन होत आहे. या आजाराविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेतल्या तज्ज्ञांच्या एका टीमने चीन आणि इतर देशातल्या कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींचा अभ्यास केला. या अभ्यासात या व्यक्तींना पाचव्या किंवा त्यापुढच्या दिवशी कोरोनाची लक्षणं दिसली आहेत. म्हणजेच कोरोना विषाणुची लक्षणं दिसायला पाच दिवस लागत असल्याचं या अभ्यासात आढळून आल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. (Corona Virus: कोव्हिड-19)

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड-19ने सध्या जगभर थैमान घातलंय. ताप, खोकला आणि श्वास घेताना त्रास होणे, अशी लक्षणं या आजारात दिसून येतात. ज्या व्यक्तीला 12 दिवसापर्यंत या आजाराची लक्षणं दिसली नाही तिला त्यानंतर ती दिसण्याची शक्यता फार कमी असते. मात्र, अशी व्यक्ती या संसर्गाची वाहक असू शकते. त्यामुळे अशा व्यक्ती ज्या संसर्गाच्या वाहक असू शकतात – आजाराची लक्षणं असो किंवा नसो – त्यांनी स्वतःला 14 दिवसांसाठी विलग म्हणजेच क्वॉरंटाईन करावं, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

यूके आणि अमेरिकेत मान्य करण्यात आलेली ही मार्गदर्शकं तत्त्वं पाळली तर 14 दिवसांसाठी विलग म्हणजेच क्वॉरंटाईन असलेल्या दर 100 व्यक्तींपैकी बाहेर पडल्यानंतर एका व्यक्तीमध्ये ही लक्षणं आढळू शकतात. Annals of Internal Medicine अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: corona news Corona virus coronavirus COVID-19 Indian Medical Association