Categories: कृषी

PM किसान योजनेचा खरोखर किती शेतकऱ्यांना लाभ झाला..? तुम्हालाही लाभ हवा असल्यास करा ‘हे’ काम!

नवीदिल्ली | पीएम किसान योजनेच्या माध्यमातून मोदी सरकारने देशातील ११ कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ९३ हजार कोटी रूपयांचा निधी वितरित केला आहे. यातील ६ वा हप्त्याचा लाभ ९ कोटी १२ लाख १४ हजार ७७१ शेतकऱ्यांना मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१८ मध्ये या योजनेची सुरवात केली होती. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या  सूत्राचे म्हणणे आहे की, यावर्षी नोव्हेंबरपर्यंत एकणू मदतीची रक्कम एक लाख कोटींपेक्षा जास्त होईल, कारण पैसे पाठविण्याचे काम चालू आहे. विशेष म्हणजे कोणताही शेतकरी कधीही नोंदणी करुन या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते.

दरम्यान, या योजनेसाठी आपण घरी बसून ऑनलाईनने अर्ज करु शकतात. याशिवाय आपल्या अर्जात काही बदल करायचे असतील तर तेही आपण ऑनलाईनने करु शकतो. यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल. 

असा करा PM Kisan योजनेसाठी अर्ज –

PM किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ अर्थात www.pmkisan.gov.in/ वर जावे. याठिकाणी होम पेज ओपन होईल. या होम पेजवर Farmers Corner हा पर्याय दिसेल. यात Status of Self Registered/CSC Farmers स्वत: नोंदणी आणि सीएससी च्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर शेतकरी आपले आधार नंबर, इमेज कोड, कॅप्चा कोड यादी गोष्टी भरून आपली नोंदणी करू शकतात. किंवा स्वतः भरलेल्या खात्याचा तपशिल जाणून घेऊ शकतात. 
आपले नाव सुचीमध्ये आहे का नाही हे पाहण्याठी लाभार्थी यादी म्हणजेच Beneficiary list वर क्लिक करावे.  यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गावाचे नाव भरुन तपासू शकता.

यांना मिळत नाही पीएम किसान योजनेचा लाभ – 

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींच्या नावावर शेत जमीन असावी, पण जर तो व्यक्ती कुठे सरकारी नोकरी किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर या योजनेसाठी पात्र नाही. यासह जर व्यक्ती माजी आमदार, खासदार किंवा मंत्री असेल तर तेही या योजनेसाठी पात्र नसतील. जर अर्ज करणारा व्यक्ती हा परवानाधारक डॉक्टर असेल, अभियंता, वकील, चार्टट अकांउंटट असेल तर तोही या योजनेस पात्र नाही. 

आत्तापर्यंत प्रत्येक हप्त्यानुसार लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी –

Period Wise Statistics
Financial Year 2018-19 – DEC-MAR : 3,15,74,023
Finacial Year 2019-20 – APR-JUL : 6,63,16,367,
– AUG-NOV : 8,75,64,137,
– DEC-MAR : 8,93,63,916,
Finacial Year 2020-21 – APR-JUL : 10,45,24,081,
– AUG-NOV : 9,12,14,771

सहावा हप्ता मिळालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आकडेवारी – 

State Name Total Beneficiaries Registered Lots created Lots Closed RFT Signed FTO Generated Payment Success Payment Failed Payment Response Pending
MAHARASHTRA 11,050,832 10,553,556 10,059,325 10,058,225 10,047,733 9,924,143 60,689 62,901
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 24000 rupees pm kisan 6000 RUPEES PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance Kisan credit card KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM kisan penssion scheme PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान क्रेडीट कार्ड किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान मानधन योजना पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना