Categories: Featured

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टल ला CSC LOGIN आणि Aadhar प्रमाणीकरण कसे करावे?

मुंबई। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या वेबसाईट वर बँकेनी अपलोड केल्या आहेत त्या याद्या डाउनलोड करण्यासाठी आपणास काय प्रोसेस करावी लागेल ते पाहूया. 

 • STEP १ – प्रथम जे रजिस्टर्ड CSC VLE म्हणून काम करत आहेत त्यांनी डिजिटल सेवा पोर्टल ओपन करून घ्यावे.
 • STEP २ – डिजिटल सेवा पोर्टल ओपन केल्यानंतर आपल्या १२ अंकी CSC ID व PASSWORD टाकून डिजिटल सेवा पोर्टल लॉगिन करून घ्यावे.
 • STEP ३ – डिजिटल सेवा पोर्टल लॉगिन करून घेतल्यानंतर आपल्या पोर्टलच्या डॅशबोर्ड ला क्लिक करा
 • STEP ४ – डॅशबोर्ड ला क्लिक केल्यानंतर आपणास महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनाचा TAB दिसेल त्यावर क्लिक करा व त्यानंतर VIEW PRODUCT वर क्लिक करा
 • STEP ५ – VIEW PRODUCT वर क्लिक केल्यानंतर आपण एका EXTERNAL PAGE वर REDIRECT व्हाल आता CSC  VLE आपल्या पोर्टलच्या डॅशबोर्ड वर लॉगिन असतील
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण कसे कराल? ( E KYC PROCESS OF FARMERS ON MJPSKY PORTAL)
 • महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकरी बँक, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांनी प्रसिध्द केलेल्या यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करतील आणि आपणाकडे त्यांचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि त्या यादीमधील विशिष्ट क्रमांक  घेऊन येतील.
 • CSC केंद्र चालकाने शेतकऱ्याकडे असणारा आधार कार्ड किंवा विशिष्ट क्रमांक पाहून आपल्या पोर्टलला तो नंबर टाकून SEARCH करावे.
 • आधार क्रमांक चुकीचा असल्यास अचूक आधार नंबर प्रविष्ट करावा
 • आता SEARCH केल्यानंतर आपणास त्या शेतकऱ्याची सर्व माहिती दिसेल
 • यामध्ये कर्ज धारकांचे नाव, बँकेचे नाव, बँकेच्या शाखेचे नाव, कर्ज खाते क्रमांक, कर्जाची रक्कम, बचत खाते क्रमांक यांसारखा संपूर्ण डेटा दिसेल.
 • शेतकऱ्याने दिलेला आधार क्रमांक व दाखिवलेल्या कर्जाची माहिती बरोबर असल्यास मान्य बटणावर क्लिक करा. नंतर दाखिवलेल्या कर्जाची रक्कम मान्य असल्यास मान्य बटनावर क्लिक करा आणि ओके बटनावर क्लिक करा.
 • सेल्फ डिक्लेरेशन चेकबॉक्स वर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण आपण कोणत्या पद्धतीने करणार आहेत ते निवडावे
CSC चालक खालील प्रमाणे शेतकऱ्याचे  आधार प्रमाणीकरण (E – KYC) करू शकतात
 • बायोमेट्रिक BIOMETRIC  पद्धतीने
 • ओ टी पी  O.T.P. पद्धतीने
 • बायोमेट्रिक पद्धतीने आधार के वाय सी करण्यासाठी आपल्याकडे बायोमेट्रिक डिवाइस असणे आवश्यक आहे.  यामध्ये आधार नंबर टाकून शेतकऱ्याचे Tumb IMPRESSION घेऊन आधार प्रमाणीकरण होऊ शकते.
 • ओ टी पी  O.T.P. पद्धतीने  आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांकडे आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS येईल. त्याव्दारे आदार प्रमाणीकरण होई शकेल.
 • सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यावर KYC यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा मेसेज दर्शवला जाईल.
 • CSC चालकाने शेतकऱ्यांना आधार KYC प्रक्रिया पूर्ण केली याची पोहच म्हणून प्रिंट या काढून नोंद पावती द्यावी.
Rajendra Hankare