Categories: बातम्या

HSC Result 2021 : बारावीचा निकाल पहा ‘या’ ठिकाणी, एका क्लिकवर

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board HSC Result 2021) MSBSHSE बारावीचा निकाल निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. HSC Result 2021 Online and Offline

कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्र सरकारने बारावीची परीक्षाच रद्द केली होती. अशावेळी निकाल कसा लावला जाणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. यंदाचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्सुकता पाहायला मिळत आहे.

विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाइनच पाहता येईल. दरवर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल जाहीर केला जातो. त्याचप्रमाणे यंदा देखील जाहीर केला जाईल. बारावीचा निकाल आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन म्हणजेच मोबाइलवर कसा पाहू शकता.

महाराष्ट्र बारावी निकाल 2021 – mahresult.nic.in वर आपला निकाल कसा पाहाल?

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने HSCचा निकाल result.mh-ssc.ac.in वर जाहीर होईल.
  • HSC Result 2021 – निकाल नेमका कसा पाहाल?
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.in यावर जाहीर करणार आहे.
  • नेमका निकाल कसा पाहता येणार?
  • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन
  • होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.
  • यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.
  • त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.
  • उदाहरणार्थ, तुमचा सीट नंबर M876544 असेल आणि तुमच्या आईचे नाव अनिता असं असेल तर तुम्ही M876544 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच ANI असं टाकावं लागेल.
  • त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल आपल्यासमोर काही क्षणात दिसू लागेल.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: HSC board HSC Exam HSC offline result hsc online result HSC Result maharashtra hsc 2021 exam