मुंबई | आज दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. यावर्षी १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. पण, यावेळी बारावीची परीक्षाच १५ दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागत आहे.  

  • एकूण २,३०,७६९ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण
  • यंदा बारावीत ९५.३५ टक्के विद्यार्थिनी तर ९३.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.
  • शाखानिहाय निकाल-विज्ञान – ९८.३०कला – ९०.५१वाणिज्य – ९१.७१व्यवसाय अभ्यासक्रम – ९२.४०
  • विभागीय मंडळनिहाय निकाल -पुणे – ९३.६१नागपूर – ९६.५२औरंगाबाद – ९४.९७मुंबई – ९०.९१कोल्हापूर – ९५.०७अमरावती – ९६.३४नाशिक – ९५.०३लातूर – ९५.२५कोकण – ९७.२१एकूण – ९४.२२
  • मुंबई विभागीय मंडळाचा निकाल सर्वात कमी ९०.११ टक्के

असा पहा बारावीचा निकाल

बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर भेट द्यावी लागेल. त्यानंतर होमपेजवरील निकाल या पर्यायावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यास एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल. त्यानंतर महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करावे लागेल. इथे लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरून सर्व प्रकिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. हा निकाल तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्याची प्रिंटही काढू शकता.

पुढील संकेतस्थळांवर बारावीचा ऑनलाइन निकाल पाहता येईल –
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in

गुणपडताळणी – गुणपडताळणीसाठी शुक्रवार १० जून २०२२ ते सोमवार २० जून २०२२ पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार १० दून २०२२ ते बुधवार २९ जून २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. तसेच यासोबत ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरता येईल.

15 दिवस उशीरा सुरू झाली होती परीक्षा
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी आणि ७ लाख ४७ हजार ४८७ विद्यार्थीनींनी परीक्षा दिली होती. यंदा बारावीची परीक्षा १५ दिवस उशीरा सुरु झाली होती. दुसरीकडे पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार घातल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र आता बुधवारी ८ जून रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.