इचलकरंजी ब्रेकींग : एकाच दिवसात ४ रूग्णांची भर, ११ वर्षीय मुलीलाही लागण

इचलकरंजी | प्रविण पवार | शहरात आज दिवसभरात चार कोरोना रुग्णांची भर पडल्याने एकच खळबळ उडालीय. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोना रूग्णात एका परदेशातून आलेल्या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. तर एक खाजगी व्यापारी, एक रिक्षाचालक तर एका ११ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. याबरोबरच हुपरी आणि रेंदाळ येथेही एक-एक रूग्ण आढळला आहे. त्यामुळे इचलकरंजी परिसरात आज ६ रूग्णांची भर पडलीय.

शहरात मंगळवारी कुडचे मळा परिसरात एक ५५ वर्षीय रुग्ण आढळून आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. हा परिसर आज सकाळी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून सील करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु होत्या. आज सायंकाळी या रूग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांचा मुलगा आणि त्याच परिसरातील एक ११ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

त्याच दरम्यान शहरातील आणखी दोघेजण कोरोनाबाधीत असल्याची माहिती मिळाली आहे. परदेशातून आलेला विद्यार्थी हा क्रिगीस्तान देशातून आला आहे. त्याला आयजीएम रुग्णालयातील विलगीकरण कक्षात मंगळवारी दाखल करण्यात आले होते. त्याच्या स्वॅबचा अहवाल आज सकाळी पॉझीटीव्ह आला. त्यामुळे त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तो स्थानिक पातळीवरील कोणाच्याही संपर्कात आला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तो मॉडर्न हायस्कूल परिसरातील एका इमारतीत राहतो.

या शिवाय येथील खासगी रुग्णालयात एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. मात्र हा रिपोर्ट खासगी प्रयोग शाळेतील आहे. या रुग्णाची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्याचा पून्हा एकदा स्वॅब शासकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हा रूग्ण दातार मळा परिसरातील रहिवाशी आहे. त्याला डेंगी सदृश्य आजाराची लागण झाल्याची शक्यता गृहीत धरुन खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या प्रवासाचा इतिहास तपासण्याचे काम प्रशासनाकडून सुरु होते.

हे ही वाचा कोल्हापूर कोरोना रिपोर्ट २४ जून २०२०, आणखी ९ पॉझिटिव्हची भर

दरम्यान आज नगरपालिका प्रशासनाने इचलकरंजी शहर पुन्हा लॉकडाऊन करण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांची मीटिंग बोलावली होती परंतु शहर लॉकडाऊन करण्याबाबत एकमत न झाल्याने उद्या सकाळी ११ वाजता याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. तशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

This post was last modified on June 24, 2020 9:52 PM

Team Lokshahi News

Recent Posts

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ खात्यात करावा लागेल अर्ज…

मुंबई | राज्यातील आयटीआय पात्रता धारकांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून ऊर्जा विभागाच्या… Read More

October 23, 2020

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरातील चार जण ठार

एसटी बस इनोव्हा कार ची समोरासमोर जोरदार धडक, मयत कोल्हापूरातील कोपार्डे | कोल्हापूर गगनबावडा मार्गावर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई | राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी… Read More

October 23, 2020

भाजपमधील ‘या’ नेत्यांच्या सल्ल्यानेच मी राष्ट्रवादीत – एकनाथ खडसे

मुंबई | गेली ४० वर्षे भाजपसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे केल्यात ‘या’ महत्वाच्या मागण्या

मुंबई | महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी… Read More

October 23, 2020

हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार – वनमंत्री संजय राठोड

कोल्हापूर | हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार असल्याची ग्वाही वनमंत्री संजय राठोड यांनी… Read More

October 22, 2020