कोल्हापूर | जिल्ह्यातील इचलकरंजी येथील कोरोनाबाधितेचा दुपारी मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १५ वर गेली आहे. इचलकरंजी येथील ७५ वर्षाच्या वृध्देला अस्वस्थ वाटू लागल्याने, आयजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला आहे.
याबरोबरच आणखी एका ७३ वर्षीय वृध्दाचाही कोरोनामुळे मृत्यु झालेल्यात समावेश आहे. त्याचा मृत्यु यापूर्वीच झाला असून अहवाल आज (७ जुलै) सकाळी प्राप्त झाला आहे. मृत्युनंतर त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान इचलकरंजी येथील कोरोनाग्रस्तांच्या मृत्युचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काल सायंकाळपासून इचलकरंजीतील दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर कोरोनाबाधितांची संख्याही इचलकरंजी आणि परिसरात वाढताना दिसत आहे.