इचलकरंजी | शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ध्यानात घेत प्रशासनाने संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलाय. इचलकरंजी नगरपालिकेच्या बैठकीत हा निर्णय झालाय. शहरातील नागरिकांतून संपूर्ण लॉकडाऊनची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
इचलकरंजी शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. एका यंत्रमाग कामगाराच्या साखळीतून संपूर्ण शहर आज कोरोनाच्या विळख्यात आल्याचे चित्र आहे. आज लॉकडाऊन बाबत झालेल्या बैठकीत नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात वादावादीचा प्रकारही घडल्याचे दिसून आले. बैठकीला नगराध्यक्षा, नगरसेवक, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
दरम्यान आज इचलकरंजी शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ७० वर गेला असून आज प्राप्त झालेल्या अहवालात शाहू पुतळ्याजवळील एका केमिकल उद्योजकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.