Categories: Featured

इचलकरंजीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताचा मृत्यु

इचलकरंजी | शहरातील कुडचे मळा येथे सापडलेला पहिला रुग्ण आज मयत पावलाय. या रूग्णाचे वय ५५ वर्षे असून ते यंत्रमाग कामगार होते. कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना त्याने रुग्णालयातून पळही काढला होता. मात्र प्रशासनाने त्यांना उपचारासाठी पुन्हा दाखल केले होते. 

रुग्णालयातून पळ काढून ही व्यक्ती थेट इचलकंजी येथे आली होती. येताना ही व्यक्ती  रिक्षातून आली होती. त्या रिक्षाचालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. भागातील नागरिकांना ही घटना समजताच त्यांनी तातडीने त्याचे घर बाहेरून बंद करून प्रशासनाला कळवले होते.

त्यानंतर प्रशासनाने त्याला पुन्हा उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवले होते. मात्र उपचारासाठी तो फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या घरातील मुलगा व नात हीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत.

Team Lokshahi News