Categories: Featured आरोग्य सामाजिक

इचलकरंजीत कोरोना रूग्णांचा आलेख वाढताच, आज ‘या’ठिकाणी आढळले आणखी ६ रूग्ण!

इचलकरंजी | प्रविण पवार | शहरामध्ये आज पुन्हा कोरोनाचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे. यामध्ये गुरूकन्नननगर मधील दोन तर त्रिशुल चौकातील चार जणांचा समावेश आहे. यामुळे कोरोना समुह संसर्गाचा त्रिशुल चौक हा दुसरा हॉटस्पॉट ठरण्याची प्रशासनासह नागरीकांना भिती वाटू लागली आहे.

इचलकरंजी शहरांमध्ये कुडचे मळ्यात ५५ वर्षीय वृद्ध कोरना पॉझिटिव्ह आढळला होता त्यानंतर कुडचे मळा ,गुरुकन्नननगर ,बाळ नगर याठिकाणी संसर्ग होऊन पॉझीटीव्ह रूग्णांची साखळी सुरू झाली होती. आज पुन्हा गुरुकन्नननगर मध्ये पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णाची मुलगी व त्याचे वडील यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुरूकन्नननगरमध्ये खळबळ माजली आहे.

त्रिशूल चौकातील २९ जून रोजी मयत झालेल्या कोरोणा पॉझीटीव्ह वृद्धाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते, त्यापैकी आज सकाळच्या सत्रामध्ये सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्रिशुल चौक परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु सायंकाळी प्रलंबित स्वॅबपैकी चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये वृद्धाचा मुलगा, पुतण्या, पुतणी आणि भाचा यांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे त्रिशूल चौकातही कोरोनाचा समूह संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे. तर त्या वृद्धाच्या संपर्कातील आणखी काही अहवाल प्रलंबित असल्याने त्रिशूल चौक परिसर कोरोनाचा दुसरा हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता असल्याने गावभाग परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

आज सापडलेल्या सहा रुग्णां मुळे शहरातील पॉझिटिव रुग्णांची संख्या ३७ वर पोहोचली आहे. आज अखेर शहरामध्ये एकूण ४० रुग्ण आढळले होते त्यापैकी सहा जण कोरोणा मुक्त झाले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर आता ३७ जणांवर उपचार सूरू आहेत.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: ichalkaranji corona positive