Categories: आरोग्य सामाजिक

इचलकरंजी शहरातील ‘या’ठिकाणी आणखी चौघेजण कोरोनाबाधित..!

इचलकरंजी (प्रविण पवार) | शहरात नव्याने चार कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये लिंबू चौक परिसराती १,  कलानगरातील २, आणि गुरुकन्नन नगरमधील १ अशा चार रुग्णांचा समावेश आहे. यामुळे इचलकरंजीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ५७ वर पोहोचला आहे

इचलकरंजी शहरातील कोरोनाची साखळी थांबत नसल्याचे दिसत आहे. आज दिवसभरामध्ये तपासणी झालेल्या अहवालात पुन्हा चार रुग्णांची भर पडलीय. यामध्ये यापूर्वी गुरूकन्नन नगर मधील कोरोना बाधित यंत्रमाग कामगाराच्या संपर्कात आल्यामुळे लिंबू चौक येथील एका आणि गुरुकन्नन नगर मधील एका यंत्रमाग कामगाराचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तर त्रिशूल चौकातील कोरोनाने मयत झालेल्या वृद्धाच्या संपर्कात आलेला कलानगर येथील पालिका कर्मचारी याच्यामुळे त्याची मुलगी आणि बहीण अशा दोघींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरामध्ये कोरणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५७ वर पोहचली आहे. यापैकी चार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे तर सहा जण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या शहरात ४७ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत

दरम्यान दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रूग्णसंख्या पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कडक केले असले तरी इचलकरंजी परिसरातील सर्वच थरातून इचलकरंजी शहर १००% लॉकडाऊन करण्याची मागणी सोशल मिडीयातून होत आहे. शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांमध्ये शंभर टक्के लॉकडाऊनचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला आहे, तर इचलकरंजी शहरातही शंभर टक्के लॉकडाउन करण्याचा निर्णय पालिका प्रशासन का घेत नाही अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: ichalkaranji corona positive