Categories: आरोग्य सामाजिक

इचलकरंजी ब्रेकींग : शहराच्या ‘या’ भागात आढळले नवे पाच रुग्ण..!

इचलकरंजी (प्रविण पवार) | शहरात कोरोनाने दोघांचा बळी घेतला असून आणखी नव्याने पाच रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे इचलकरंजी शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ८० वर पोहोचली आहे. तर आज पर्यंत मृत पावलेल्या रूग्णांची संख्या सहावर गेली आहे. 

इचलकरंजी शहरांमध्ये आजही रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. यामध्ये दिवसभरामध्ये आज पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये स्वामी मळा येथील साई मंदिर परिसरातील १, भाग्यरेखा टॉकीज समोरील कामगार चाळीमध्ये १, महासत्ता चौक रिंग रोड येथे १, सातपुते गल्ली १,  तर संत मळा याठिकाणी १ अशा पाच रूग्णांचा समावेश आहे. 

शहरातील नामांकित बँकेतील कर्मचारी कोरोना पाझीटीव्ह आल्यामुळे बँकेतील सरकारी कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील सर्वच्या सर्व २२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर कुडचे मळ्यातील यंत्रमाग कामगाराच्या जावयाच्या संपर्कात आलेल्या कोरोचीतील सहा जणांचे तर कबनूर येथील तीन जणांचे अहवाल देखील आज निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोची आणि कबनूर वासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान महासत्ता चौक येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे आज दुपारी आयजीएम रूग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले आहे. तर रविवारी रात्री वर्धमान चौक येथील व्यापाऱ्याचा मृत्यू झाला होता.

Team Lokshahi News