Categories: आरोग्य सामाजिक

इचलकरंजी : कोरोनामुळे ‘हा’ परिसर सील

इचलकरंजी | प्रविण पवार | शहरामध्ये सोमवारी त्रिशुल चौक, गुरुकन्नननगर या भागांमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे सदर चा परिसर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने आज सॅनीटायझर फवारून निर्जंतुकीकरण केला आहे. तसेच रुग्ण सापडलेल्या ठिकाणापासून तीनशे मीटर चा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

इचलकरंजी शहरांमध्ये कोरोनाची साखळी सुरूच असून सोमवारी पुन्हा कुडचे मळा येथे दोन रूग्ण, जुना चंदुर रोड येथे एक रुग्ण, गुरुकन्नन नगर आणि त्रिशूल चौक येथे प्रत्येकी एक रुग्ण असे दिवसभरात पाच रुग्ण आढळले होते. त्यापैकी त्रिशूल चौकातील वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याठिकाणी आज नगरपालिकेच्या वतीने पूर्ण परिसरात सॅनिटायझर फवारून स्मशानभूमी निर्जंतुकीकरण करण्यात आली. 

याबरोबरच त्रिशूल चौकाच्या परिसरातील अवधूत आखाडा, खारपाटील गल्ली ,रिंग रोड तर गुरुकन्नन नगरमधील मठाच्या पाठीमागील बाजूच्या एक ते पाच गल्ल्या आज सॅनिटायझर फवारून निर्जंतुकीकरण करण्यात आल्या. यावेळी नगरपालिकेचे संजय कांबळे व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते दरम्यान हा सर्व परिसर चारी बाजूनी सील केला असून  परिसरातील सर्व उद्योगधंदे बंद करण्यात आले आहेत.

Team Lokshahi News