Categories: Featured कृषी

PM किसान : शेतकरी बंधूनो आता करा अर्ज, ३१ जुलै पुर्वी मिळवा २००० रूपये!

नवीदिल्ली | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रूपयांचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकरी वर्गाला त्वरीत या पैशाचा वापरही करता येतो. 

सध्या देशातील जवळपास ९.८७ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असून सरकारने या योजनेच्या माध्यमातून ७२ हजार कोटी रूपयांचे वितरण केले आहे. अद्यापी या योजनेत सरकारने ठरवलेल्या उद्देशाइतका शेतकऱ्यांचा समावेश झाला नसून काही तांत्रिक अडचणींमुळे या समस्या येत आहेत. तर अद्यापी काही शेतकऱ्यांनी या योजनेत स्वतःचे नाव रजिस्टर देखील केलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी जून २०२० मध्ये तात्काळ रजिस्ट्रेशन केल्यास त्यांना पुढील महिन्यात म्हणजेच जुलै २०२० मध्येच २००० रूपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला असून जुलै २०२० मध्ये हप्ता मिळाला तरी लगेच ऑगस्ट २०२० मध्ये रेग्युलर हप्त्याप्रमाणे पुढील हप्ताही मिळणार आहे. म्हणजेच जुलै मध्ये हप्ता मिळाला तरी पुढील हप्ते लगेचच सुरळीतपणे मिळण्यास सुरवात होणार आहे. या योजनेचा ६ वा हप्ता ऑगस्ट २०२० मध्ये देण्याचे सरकारने घोषित केले आहे. 

वर्षातील ४ महिन्यांच्या अंतराने ३ हप्ते या योजनेत दिले जात असून डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९, एप्रिल २०१९ ते मार्च २०२० आणि आता एप्रिल २०२० ते पुढे असे हप्ते मिळत आहेत. यंदाच्या वर्षातील हप्ता एप्रिल २०२० ते जुलै २०२० च्या दरम्यान दिला जात आहे. परंतु सरकारने हा हप्ता एप्रिलमध्येच दिला आहे. त्यामुळे आता नव्याने नोंदणी करण्यांना तात्काळ लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

अशी करा नावाची नोंदणी –

केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्याकरिता थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी pmkisan.gov.in संकेतस्थळावर फार्मर कॉर्नरवर नवीन नोंदणी या लिंकवर थेट अर्ज भरता येतो. अर्जाची भाषा इंग्रजी असली तरी अर्जाची रचना सोपी आहे, त्यामुळे राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरल्याची माहिती आहे. ग्रामीण भागात स्वतः नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असली तरी इंटरनेट साक्षरता वाढीसाठी देखील ही योजना उपयुक्त ठरत आहे. (वरील नवीन नोंदणी शब्दावर क्लिक केल्यास, थेट फॉर्म भरण्याच्या लिंकवर पोहचाल)

नवीन सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रूपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. नावात चुक झाल्यास दुरूस्ती करता येत आहे. तसेच या योजनेतील आपल्या सहभागाची सद्यस्थिती देखील शेतकऱ्याला समजत आहे. या संकेतस्थळावर फार्मर्स कॉर्नरमध्ये पाच पर्याय देण्यात आले असून त्यात नवे शेतकरी नोंदणीआधार क्रमांक दुरुस्तीशेतकऱ्याच्या अनुदानाची सद्य:स्थिती, लाभार्थ्यांची यादी, स्वतः किंवा सीएससीमधून केलेल्या नोंदणीची सद्य:स्थिती असे पाच पर्याय देण्यात आले आहेत. गरजेनुसार शेतकऱ्यांने पर्यायाची निवड करून आपली माहिती जमा करणे गरजेचे आहे. 

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या नवीन  नोंदणीसाठी क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा आधार नंबर टाकावा लागतो. त्यानंतर शेजारी येणारा कॅप्चाकोड भरून द्यावा लागतो. अगोदर नोंदणी झाली असल्यास स्क्रीनवर तसा संदेश दाखविला जातो, अथवा नोंदणी झालेली नसल्यास थेट अर्ज उघडला जातो. याठिकाणी राज्य निवडून आपल्या गावाची माहिती भरल्यावर शेतकऱ्याला स्वतःचे नाव टाकावे लागते.  त्यानंतर कॅटेगिरीत पुन्हा जनरल, एससी किंवा एसटीवर क्लिक करावे लागते. यानंतर जमीनधारणा एक-दोन हेक्टरपर्यंत आहे की त्यापेक्षा वेगळी असे पर्याय येतात. ते क्लिक केल्यानंतर बॅंकेचा आयएफसी कोड व बॅंकेचे नाव, अकाऊंट नंबर टाकल्यास शेजारी ‘सब्मिट फॉर आधार ऑथिन्टिकेशन’ असा पर्याय येतात. तेथे क्लिक केल्यानंतर पुढे मोबाईल नंबर, जन्मतारिख व वडिलांचे नाव टाकावे लागते.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज भरताना सातबारा वैयक्तिक (सिंगल) आहे की सामायिक (जॉईंट) आहे यावर क्लिक करावे लागते. शेतकऱ्याला पुढे त्याचा सर्वेनंबर विचारला जातो. तो भरल्यानंतर डाग किंवा खासरा नंबर विचारला जातो. मुळात ही संज्ञा आपल्याकडे नसून उत्तर भारतातील असल्याने शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी शून्य टाकावे. पुढे आपले क्षेत्र टाकून अॅड या पर्यायाला क्लिक केल्यानंतर ‘मी ही माहिती खरी असल्याचे घोषणापत्र लिहून देत आहे’ अशी ओळ येते, त्याच्या पुढे क्लिक करून ‘सेव्ह’ पर्याय दाबला की, शेतकऱ्याचा अर्ज पोर्टलवर नोंदणीसाठी पुढे जातो.

  • शेतकरी घर बसल्या नोंदणी करू शकतात.
  • किसान सन्मान योजनेत नोंदणी किंवा दुरुस्ती करण्यापूर्वी आधार नंबर, बॅंक खाते पुस्तक आणि सातबारा उतारा तयार ठेवावा.
  • इंटरनेट सुविधा नसल्यास गावातील आपले सरकार सेवावर केंद्रावर (सीएससी) फक्त १५ रुपये शुल्क देऊन नोंदणी करता येते.
  • दुरुस्तीसाठी केवळ १० रुपये शुल्क असून कोणत्याही सीएससीचालकाने जाद रक्कम आकारल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करता येते.

इथंपर्यंत शेतकऱ्यांने अर्ज भरण्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर पुढची जबाबदारी तलाठी कार्यालयावर येते. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याने आपला सातबारा, खाते पुस्तकाची प्रत आणि आधारनंबरची नक्कल यांच्या ‘हार्डकॉपीज’  झेरॉक्स आपल्या गावच्या तलाठी कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांच्या अर्जावर पुढील प्रक्रिया केली जाते. कारण, राज्य शासनाने शेतकरी सन्मान योजनेची ग्रामपातळीवरची माहिती संकलित करण्याची जबाबदारी तलाठ्याला दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्जासाठी भरलेल्या नोंदीच्या वरील तीन कागदांच्या प्रती तलाठ्याच्या ताब्यात देऊन त्या मिळाल्याची ‘पोच घेऊन ठेवणे’ अत्यंत गरजेचे आहे. ही पोच कालांतराने आपण तलाठी कार्यालयाकडे या योजनेसाठी कागदपत्रे जमा केली असल्याचा पुरावा म्हणून उपयोगी पडू शकते.

शेतकऱ्याने केंद्र शासनाच्या पोर्टलवर जाऊन शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज भरल्यानंतर हे अर्ज पुढे तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयातून संबंधित गावच्या तलाठ्याकडे तपासणीसाठी येतात. शेतकऱ्यांने भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री करण्याबरोबरच अर्ज बोगस नसल्याची पडताळणी देखील केली जाते. पुढे ही यादी तहसीलदार पातळीवरून अंतिम केली जाते. आणि पुढे हीच माहिती दिल्लीत केंद्र शासनाकडे पाठविली जाते. केंद्र सरकारला ही यादी प्राप्त झाल्यानंतर राज्यातल्या कोणत्याही यंत्रणेला मध्यस्थी न ठेवता सदर यादीनुसार थेट शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात दोन हजारांची रक्कम जमा होते.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA animal husbandory buy insurance Dairy farming in India dairy farming in Maharashtra Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान कॉल सेंटर योजना किसान क्रेडिट कार्ड की वैधता किसान क्रेडिट कार्ड कैसे बनवाएं किसान क्रेडिट कार्ड धारक की मृत्यु किसान क्रेडिट कार्ड नवीनीकरण किसान क्रेडिट कार्ड महाराष्ट्र किसान क्रेडिट कार्ड योजना 2019 किसान क्रेडिट कार्ड हेल्पलाइन नंबर किसान सम्मान निधि योजना पशुपालन पशुपालनासाठी कर्ज पशुसंवर्धन पशुसंवर्धन विभाग पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना पीक कर्ज माफ पीक कर्ज व्याज सवलत प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना महात्मा फुले कर्ज माफी योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान कॉल सेंटर