Categories: Featured

नरेंद्र मोदी पंतप्रधान असते तर…

आज आदरणीय नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असते तर नेपाळ्यांची काय हिंमत भारतावर हल्ला करण्याची? महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही, देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री नाहीत, म्हणून या नेपाळ्यांना जोर आलाय. आज अमित शहा केंद्रीय गृहमंत्री असते तर नेपाळ्यांनी गोळीबार केलाच नसता, चिनचे सैन्य भारतात घुसलेच नसते.

नेपाळ हा बारकुसा देश बिहारच्या बॉर्डरवर आहे. बिहारमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूका आहेत. आता काही गुलाम म्हणतील, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरच भाजपने गोळीबाराचा कट रचलाय. अरे गुलामांनो कोरोनाचे एवढे मोठे संकट असताना आम्ही कोरोनावर लक्ष ठेवावे का गोळीबारावर ? आमचे अमित शहा म्हणाले की, ‘कोरोना नियंत्रणात आम्ही अपयशी ठरलो. पण विरोधकांनी तरी काय केले?’ त्यांचे म्हणणे बरोबरच आहे. कारण भक्त मुलं जन्माला घालण्यात अपयशी ठरला म्हणून काय झाले? भक्तांच्या शेजाऱ्यांची काही जबाबदारी आहे की नाही?

नेपाळ हिंदुबहुल राष्ट्र. अशावेळी अखंड हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपची सत्ता केंद्रात असती तर त्या नेपाळ्यांची काय बिशाद भारताकडं नजर वर करुन पाहण्याची? पण देशात सत्ता काँग्रेसची, पंतप्रधान पदावर नेहरू बसलेत म्हणून बारक्या बारक्या देशांनाही माज आलाय.

आज नेपाळनं हल्ला केलाय, उद्या भुतान, परवा म्यानमार, मग चीन, श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान…

पण, लक्षात ठेवा जोपर्यंत पितृतुल्य नरेंद्रभाई मोदी भारताचे पंतप्रधान होत नाहीत, तोपर्यंत भारत सुरक्षित नाहीच. २०१४ लाही माझं हेच म्हणणं होत आणि आजही माझं तेच म्हणणं आहे. देशाला नरेंद्रजी मोदींसारख्या कणखर नेतृत्वाची गरज आहे.

कट्टर मोदी समर्थक : नितीन थोरात (फेसबुक वॉलवरून साभार)

Team Lokshahi News