भारतीय हवामान विभागाने (IMD Monsoon forecast) यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे.
नवी दिल्ली। यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज आज दुपारी ३ वाजता जाहीर झाला आहे. देशातील सर्व बळीराजाचे याकडे लक्ष लागून राहिलेले होते. हा अंदाज शेतकरी वर्गासाठी दिलासादायक यावा यासाठी शेतकरी वर्ग मनोमन प्रार्थना करत होता, आणि अपेक्षेप्रमाणे हा अंदाज आला असून यंदा मान्सून चांगला होणार असल्याचे संकेत आहेत. जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस चांगला होणार असल्यानं शेतकऱ्यांना यावेळी पेरणी वेळेत करता येणार आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल असं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलयं. या वृत्तामुळे राज्यासह देशभरातील शेतकरी नक्कीच सुखावणार आहे.
मान्सून बाबतचा पहिला अहवाल आज हवामान खात्याने जाहीर केला. या अहवालानुसार यंदा हा मान्सून वेळेत म्हणजे १जूनपर्यंत दाखल होईल. त्यानंतर चेन्नईकडून ४ जून पंजाब ७ जून, हैदराबाद ८ जून, पुणे १० आणि मुंबई ११ जून असा प्रवास करत दिल्लीपर्यंत २७ जूनला पोहोचेल.
तसेच २०२० या वर्षात मान्सूनचा पाऊस हा दीर्घकालीन सरासरीच्या १०० टक्के असेल, तर मॉडेलच्या त्रुटीमुळे ५ किंवा -५% असा त्रुटी येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मागच्या वर्षी मान्सून उशिरा आला होता आणि पाऊस कमी पडल्यानं शेतकऱ्यांची पेरणीही लांबली होती. मोठं नुकसान झालं होतं यंदा मात्र मान्सून वेळेत येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.