Categories: Featured

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; पहा २० ऑक्टोबर पर्यंतचा संपूर्ण हवामान अंदाज

पुणे | बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाल्याने देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यभर मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवल्याचे चित्र पहायला मिळाले. आजही राज्यात असाच मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून उत्तर कोकणासह मुंबई आणि ठाण्यात रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. 

दरम्यान चक्रीवादळाची अरबी समुद्राकडे वाटचाल सुरू असल्याने गुरूवारी (१५ ऑक्टोबर) ठाणे, पालघर, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर यापूर्वी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले आहे.

  • हवामान अंदाज – Weather Forecast 14 Oct. 2020 to 20 Oct. 2020 (👈 येथे क्लिक करा)
  • या चक्रीवादळाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी Live Cyclone 👈 या शब्दांवर क्लिक करा आणि पहा त्याचा प्रवास. महाराष्ट्रातील स्थिती पहा (Cyclone)

सध्या हे चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवरून जमीनीवर आल्यानंतर महाराष्ट्राच्या दिशेने सरकले आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात सध्या या चक्रीवादळाचे लोकेशन दिसत असून ते अरबी समुद्राच्या दिशेने सरकत आहे. 

Photo By – Vitthal Pisal, Palus
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: august weather forecast July weather forecast live cyclone live hurricane monsoon 2020 monsoon climate Monsoon in Maharashtra in the next 24 hours monsoon weather monsoons in india northeast monsoon nutritious kharif October 2020 live hurricane signs of good rains southwest-monsoon summer monsoon types of monsoon Weather forecast आजचे हवामान अंदाज 2020 live हवामान अंदाज 2020 हवामान अंदाज पुणे हवामान अंदाज मराठवाडा हवामान अंदाज महाराष्ट्र 2019 हवामान अंदाज महाराष्ट्र 2020