Categories: सामाजिक

आंतरजिल्हा खाजगी प्रवासी वाहतूकीसाठी प्रशासनाचा महत्वाचा निर्णय..!

कोल्हापूर | आंतरजिल्हा वाहतूक करताना खासगी प्रवासी बसेस यांच्यावरील निर्बंध उठविण्यात आले असून प्रवासास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली आहे.

प्रवासासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही –

खासगी प्रवासी बसेस यांनी अंमलात आणावयाची मानक कार्यपध्दती याप्रमाणे-
१. खासगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोव्हिड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच
परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे.
२. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम २० (१) (X) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या
प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे.
कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक
दिवशी प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण करावे. तसेच कंत्राटी बसच्या चालकाने प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे
निर्जंतुकिकरण करावे.
३. बसचे आरक्षण कक्ष कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच सदर ठिकाणी
उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क, सैनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात
त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
४ मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये. बसचे प्रवेशव्दाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात
यावे, तसेच बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत.
५. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची धर्मल गन द्वारे तपासणी करण्यात यावी. एखादया प्रवाशास ताप,
सदी.
खोकला इ. प्रकारची कोव्हिड-१९ आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास, अशा प्रवाशांना बसमधून
प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा,
६. कंत्राटी बस (सिटीग) वाहनांमध्ये प्रवासी एका आड एक पध्दतीने आसनस्थ होतील. अशाप्रकारे प्रवासी
वाहतुकीस परवानगी असेल स्लिपर बस वाहनामध्ये डबल बर्थ वर एक प्रवासी तसेच स्वतंत्र सिंगल बर्थ वर
एक प्रवासी याप्रमाणेच वाहतुकीस परवानगी असेल.
७. चालकाने प्रवासा दरम्यान जेवण/अल्पोपहार/प्रसाधनगृहाचा वापर या कारणाकरिता बस थांबविताना ही
ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री करावी.
८. बसमध्ये चढताना व उतरताना तसेच खानपानाकरिता व प्रसाधगृहाच्या वापराकरिता प्रवासादरम्यान बस थांबविली असताना प्रवासी शारीरिक अंतर पाळतील याची दक्षता घ्यावी.
९. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये. त्यांना कचराकुंडीचा वापर करण्याच्या व बस स्वच्छ राखण्याच्या सूचना द्याव्यात.
१०. प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकांची असेल. ११. सूचनांचे पालन न केल्यास परवानाधारकाविरुध्द मोटार वाहन अधिनियम, 1988 केंद्रीय मोटार वाहन
नियम, 1989, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही नमदू आहे.

Team Lokshahi News