Categories: कृषी

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

मुंबई | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित निधीसाठी राज्य सरकारने 1 हजार 500 कोटी रूपयांचा निधी आकस्मिकता निधी अग्रिमातून उपलब्ध करून देण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आकस्मिकता निधीत तात्पुरती वाढ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आकस्मिकता निधीतून शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी रक्कम उपलब्ध
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1 हजार 500 कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रिमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
यासाठी आकस्मिकता निधीच्या 150 कोटी रुपये इतक्या कायम मर्यादेत 1500 कोटींची तात्पुरती वाढ करून ती 1650 कोटी रुपये इतकी करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल. 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांपैकी २७.३८ लाख खातेदारांना लाभ देण्यात आला आहे. २० जुलै २०२० अखेर यासाठी १७ हजार ६४६ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आली होती. या योजनेसाठी शासनाने ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली. एकूण संख्येपैकी जवळपास ८३ टक्के खातेदारांना आतापर्यंत लाभ देण्यात आला आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Mahatma Jotiba Phule Debt Waiver Scheme List Mahatma Jotirao Phule Farmers Debt Relief Scheme 2019 Mahatma Jyotiba Phule Debt Forgiveness Mahatma Jyotiba Phule Debt Forgiveness Scheme Mahatma Jyotiba Phule Farmers Debt Relief Scheme Mahatma Phule Debt Forgiveness List Mahatma Phule Debt Waiver Scheme Mahatma Phule Debt Waiver Scheme list पीएम किसान सन्मान निधी योजना प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महात्मा फुले कर्ज माफी यादी महात्मा फुले कर्ज माफी योजना