मुंबई | आयटीआय अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत संपली असून येत्या शनिवारी गुणवत्ता यादी प्रसिध्द होणार आहे. कोरोनाचे सावट सर्वच क्षेत्रावर असताना शिक्षण क्षेत्र ही यातून सुटले नाही. मात्र विद्यार्थ्यांनी व्यवसायिक शिक्षणाला पसंती देत प्रवेशक्षमतेच्या तुलनेत दुप्पट नोंदणी केली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट झाले.
राज्यातील खासगी आणि सरकारी आयटीआयमध्ये जागांसाठी प्रवेशाची पहिली प्रवेश यादी ८ सप्टेंबरला जाहीर करण्यात येईल.
नव्याने अर्ज करण्यासाठी १० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एकत्रित गुणवत्ता यादी ११ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर १२ ते १८ ऑक्टोबर जिल्हास्तरावर समुपदेशन फेरी राबविण्यात येणार आहे. या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक आयटीआयच्या या वेबसाईटवर उपलब्ध वरून देण्यात आले आहे. https://admission.dvet.gov.in