नवी दिल्ली। लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये शेतकरी वर्गाचेही हित जपण्याचे काम सरकार सातत्याने करत असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करण्यात आले.
दरम्यान सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेण्याच्या विचाराधीन असल्याचे समजत आहे. आता ओढावलेल्या संकटात वर्षाला दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांमधून शेतकऱ्यांना तितकासा फायदा होत नसल्याचे स्वामीनाथन फाऊंडेशनने म्हटले आहे. यामुळे सरकारने यातील रक्कम राशी वाढवावी आणि शेतकऱ्यांना वर्षाला १५ हजार रुपये द्यावे असे स्वामीनाथन फाऊंडेशनकडून सांगण्यात आले आहे. स्वामीनाथन फाऊंडेशनने यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव सरकारपुढे मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर शेतकऱ्यांना दोन हजारांच्या हप्त्याऐवजी ५००० रुपयांचे तीन हप्ते मिळण्याची शक्यता आहे.
येत्या आर्थिक वर्षातील पीएम किसान २०२० च्या लाभार्थ्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. पीएम किसान सन्मान निधीची यादी आपण ऑनलाईनही पाहू शकता. www.pmkisan.gov.in संकेतस्थळावरती जाऊन आपण ही यादी घरबसल्या आपल्या मोबाईलवरूव पाहु शकता.
पीएम – किसान योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात
कसा करणार योजनेसाठी अर्ज – योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता. किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता. याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम – योजनेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करु शकता. हे शक्य नसेल तर आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊनही आपला अर्ज करू शकता.