Categories: Featured

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ निर्णय..!

नवी दिल्ली | ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन कागदपत्रांची वैधता पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. गडकरी यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

१ फेब्रुवारी २०२० रोजी कालबाह्य होणाऱ्या किंवा आतापासून ३१ डिसेंबरपर्यंत कालबाह्य होणाऱ्या मोटार वाहन कागदपत्रांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फिटनेस, परमिट, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा विमा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता संपलेली आहे किंवा देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्यांचं नूतनीकरण करण्यात अडचणी येत आहेत, अशा वाहनधारकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. यासंदर्भातील आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.

Team Lokshahi News