Categories: गुन्हे बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत तब्बल 74 कोटी 16 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत राज्यात तब्बल 74 कोटी 16 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे. 

एप्रिल 2020 ते 22 डिसेंबर 2020 पर्यंत नऊ महिन्याच्या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत 32,238 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या कालावधीत 19,462 आरोपींना अटक करण्यात आले. या सर्व कारवाईत 74 कोटी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याबरोबरच 2,663 वाहने जप्त करण्यात आली आहेत. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

हातभट्टी, परराज्यातील अवैध मद्य, अवैध मद्यार्क निर्मिती, वाहतूक आणि विक्री विरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु आहे. तक्रारदार आपली तक्रार
टोल फ्री क्रमांक – 18008333333
व्हाट्सॲप क्रमांक – 8422001133 आणि
ईमेल excisecontrolroom@gmail.com यावर करु शकतात.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: tate excise department