Categories: सामाजिक

नव्या वर्षात, नव्या रूपात… देशातील ‘या’ नागरिकांना मिळणार रेशनकार्ड

नवी दिल्ली | रेशनकार्डच्या बाबतीत केंद्र सरकारने अनेक महत्वाचे बदल केले असून आता तुमचं रेशन कार्डही यामुळे बदलावं लागणार आहे. ‘एक नेशन एक रेशन कार्ड’ योजने अंतर्गत आता नव्या वर्षात नव्या रुपात ATM कार्ड दिसणार आहे. केंद्र सरकारने रेशन कार्डमध्ये बदल करण्यास सुरुवात केली असून जवळपास 84 कोटी नागरिकांना ATM कार्ड स्वरूपातील स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे. याची सुरुवात बिहारमधून होणार आहे.

‘एक नेशन एक रेशन कार्ड’ योजनेमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला फायदा होणार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. त्याचबरोबर आता आपलं रेशन कार्ड देशातील कुठल्याही राज्यात चालणार आहे. त्यामुळे नोकरीसाठी अन्य राज्यांत गेलेल्या नागरिकांना, विस्थापित झालेल्या मजुरांना रेशन कार्ड बदलून घेण्याच्या कटकटीपासून कायमची मुक्ती मिळणार आहे. ‘एक नेशन एक रेशन कार्ड’चा आतापर्यंत देशातील 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.

वन नेशन वन रेशन कार्ड’चे फायदे : 

  • वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत सध्या जुन्या कार्डवरच धान्य मिळत आहे.
  • तुम्ही ज्या राज्यात आहात, तिथे तुमच्या जवळील रेशन दुकानदाराकडे जाऊन तुम्ही रेशन कार्ड बनवू शकता. तिथे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज देखील करता येऊ शकतो.
  • योजनेचा फायदा कसा मिळवाल : तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्ड लिंक करुनही रेशनचा लाभ मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे बीपीएल कार्ड असणं गरजेचं आहे. त्यासह काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. रेशन कार्ड बनवण्यासाठी प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पोर्टल आहेत. त्यावर बीपीएल कार्डधारक रेशन कार्डसाठी अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळालेली पोचपावती तुम्हाला तहसील कार्यालयात अन्न पुरवठा अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे.
Team Lokshahi News