Categories: Featured

कमाई ३०० रूपये आणि इन्कम टॅक्स तब्बल १ कोटी ५ लाख; कल्याणच्या तरूणाची अजब कहाणी

कल्याणदिवसाची कमाई अवघी ३०० रूपये आणि इन्कम टॅक्स तब्बल १ कोटी ५ लाख रूपये…. वाचून आश्चर्य वाटलं ना… होय पण हे खरं आहे. ही घटना घडलीय कल्याण मधील एका तरूणाच्या बाबतीत. भाऊसाहेब अहिरे असे नाव असलेल्या या तरूणाला आयकर विभागाकडून (Income Tax Department) ही कोट्यावधीची रक्कम भरण्याची नोटीस दिली गेलीय. याप्रकरणी भाऊसाहेब याने इन्कम टॅक्स विभाग आणि पोलिसांना संबंधित प्रकरणाचा तपास करुन ठोस कारवाईची मागणी केली आहे.

कल्याण जवळ असलेल्या मोहने येथील आर. एस. टेकडी परिसरात राहणारे भाऊसाहेब आहिरे हे एका पत्र्याच्या झोपडीत राहतात. त्यांना दोन मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे. ते हातमजूरी करुन कुटुंबाचे पोट भरतात. त्यांना दिवसाला केवळ तीनशे ते चारशे रुपये रोजंदारी मिळते. त्यातही सातत्य नसते. त्यात त्यांना इन्कम टॅक्स विभागाने चक्क १ कोटी ५ लाख रुपये भरण्याची नोटीस पाठवली असून त्यांना धक्का दिलाय.

वास्तविक भाऊसाहेब अहिरे यांच्या नावाचा आणि त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करून नोटाबंदीच्या काळात मुंबईतील कोटक महिंद्रा बँकेत खाते उघडले गेले आहे. या खात्यावर मोठ्या रक्कमेचा व्यवहार झाला आहे.  परंतु याविषयी भाऊसाहेब यांना कोणतीही माहिती नाही. दरम्यान त्यांना इन्कम टॅक्सची दोन वेळा नोटीस आलीय. त्यामुळे ते भांबावून गेले आहेत.

विशेष म्हणजे भाऊसाहेब त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीही मुंबईला गेलेले नाहीत. या प्रकरणी त्यांनी इन्कम टॅक्स आणि ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: bank fraud bank insurance crop insurance Income Tax Department Kotak Mahindra bank आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स चोलामंडलम जनरल इन्शुरन्स टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स प्रधानमंत्री पीक विमा योजना राष्ट्रीय कृषि विमा योजना विमा योजना श्रीराम जनरल इन्शुरन्स