मुंबई | इंडियन बँकेनं स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी रिक्त जागांवर भरती जाहीर केली आहे. आजपासून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत साइट indianbank.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जून 2022 निश्चित करण्यात आली आहे.
इंडियन बँकेतील या भरतीद्वारे 312 विविध पदांची भरती केली जाणार आहे. या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. या भरतीअंतर्गत काही पदांसाठी अर्ज करण्याचं कमाल वय 30 वर्ष, काहींसाठी 35 वर्ष तर काहींसाठी 38 वर्ष आणि 40 निश्चित करण्यात आलं आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या (Interview) आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल.
असा करा अर्ज
- अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट indianbank.in ला भेट द्यावी
- त्यानंतर होम पेजवर दिलेल्या करिअर विभागात जा
- आता येथे स्पेशलिस्ट ऑफिसर्स 2022 च्या भर्तीच्या लिंकवर क्लिक करा
- त्यानंतर नोंदणीसाठी क्लिक करा या लिंकवर क्लिक करा
- आता उमेदवाराचा मेल आयडी टाकून नोंदणी करा
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रं अपलोड करा
- आता अर्जाची फी भरा
- शेवटी सबमिट वर क्लिक करा