कोल्हापूर।प्रसिध्द कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात कार्यक्रम होत असून या कार्यक्रमावरून अनिस आणि पुरोगामी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे इंदोरीकर महाराजांचा हा कार्यक्रम कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आला असून स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचा विद्यापीठात कार्यक्रम नको, अशी आक्रमक भूमिका कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
शिवाजी विद्यापीठात ४ वाजता इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र त्याआधीच अंनिसचे कार्यकर्ते विद्यापीठात जाऊन जाब विचारणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरात इंदोरीकर महाराज यांच्या एण्ट्रीआधी वातावरण चांगलंच तापल्याची दिसत आहे. इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनादरम्यान सम-विषम तारखांवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
धावपळीच्या जीवनात दररोज 'खजूर'
खाणे किती गरजेचे आहे, एकदा अवश्य वाचा!
यावरून त्यांना अहमदनगर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत नोटीस देण्यात आली होती. यावर इंदोरीकरांनी खुलासाही केला होता. यावर आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटीस देण्यात आली असून इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तुम्हाला सहआरोपी केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, शिवमहोत्सावात इंदोरीकरांच्या आयोजित कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र पाठिंबा दर्शवला असून, अंनिसचा विरोध मोडून काढण्याचा निर्धार हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. त्यासाठी संघटनांचे कार्यकर्ते विद्यापिठात दाखल होणार आहेत.