Categories: अध्यात्म

अखेर किर्तनकार इंदुरीकरांचा कोल्हापूरकरांना दूरूनच रामराम

शिवाजी विद्यापीठातील कार्यक्रम रद्द

कोल्हापूर। किर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात होणारा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. आपण कोणत्याही संघटनेच्या दबावाला बळी पडलो नाही असं आयोजकांनी स्पष्ट केलं. तीन महिन्यांनी विद्यापीठाबाहेर कार्यक्रम घेणार असल्याचंही आयोजकांनी स्पष्ट केलं. इंदुरीकर महाराजांना वेळेवर पोहचणं शक्य नसल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचंही आयोजकांनी म्हटलं आहे.

दरम्यान इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम रद्द करण्यात यावा या मागणीसाठी कालपासून विविध संघटना, महिला कार्यकर्त्या आणि अंनिसने आक्रमक भूमिका घेतली होती, तर हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र इंदोरीकरांच्या कार्यक्रमाला पाठिंबा दर्शवला होता. परंतु वाढता विरोध लक्षात घेता आयोजकांवर कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.

Team Lokshahi News