Categories: अर्थ/उद्योग सामाजिक

कोल्हापूर : आजपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरु, ‘असे’ आहे वेळापत्रक

कोल्हापूर | कोल्हापूर विभागातील सर्व आगारांमार्फत दिनांक 20 ऑगस्ट पासून आंतर जिल्हा वाहतूक सुरु करण्यात येत आहे. दिनांक 22 ऑगस्ट रोजी असणाऱ्या गणेशोत्सव सणासाठी जिल्ह्यातील कोणत्याही बस स्थानकावरुन पुरेशे प्रवाशी उपलब्ध झाल्यास जादा बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशाच्या सुविधेसाठी नजिकच्या आगारातून येणाऱ्या फेऱ्याची माहिती प्राप्त होण्यासाठी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विभाग नियंत्रक रोहन पलगे यांनी केले आहे.

आगार, दूरध्वनी क्रमांक फेऱ्याचे मार्ग, सुटण्याची वेळ या प्रमाणे-

कोल्हापूर-0231-2650620/2666674 कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-इस्लापूर प्रत्येक तासाला.

संभाजीनगर 0231-2621431/2621416, संभाजीनगर-पुणे सकाळी 10 वाजता.

इचलकरंजी-0230-2432496/2432202 इचलकरंजी-सांगली, इचलकरंजी- मिरज प्रत्येक तासाला, इचलकरंजी-चिपळूण सकाळी 7.30 वाजता. इचलकरंजी-सोलापूर सकाळी 8.30 वाजता. इचलकरंजी-रत्नागिरी सकाळी 9 वाजता.

गडहिंग्लज-02327-222306/222264 गडहिंग्लज-पुणे सकाळी 10 वाजता.

गारगोटी 02324-220035/220022 गारगोटी-पुणे सकाळी 8.30 वाजता.

मलकापूर 02329-224156/224131 मलकापूर-पुणे व्हाया शेडगेवाडी सकाळी 9 वाजता. कोल्हापूर-रत्नागिरी सकाळी 11.30 वाजता.

चंदगड 02320-224132/224124 चंदगड-निगडी सकाळी 10 वाजता.

कुरुंदवाड 02322-244203/244237 कुरुंदवाड-पुणे स्टेशन सकाळी 8 वाजता. कुरुंदवाड-सांगली सकाळी 7.20 वाजता व दुपारी 1.30 वाजता.

कागल 02325-244076/244064 कागल-सातारा दुपारी 12 वाजता, कागल-पुणे सकाळी 8.30 वाजता.

राधानगरी 02321-234038/234024 राधानगरी-पुणे सकाळी 8.30 वाजता.

गगनबावडा – 02326-222017/222011 गगनबावडा-सातारा दुपारी 1.30 वाजता.

आजरा – 02323-224396/246140 आजार-पुणे सकाळी 10 वाजता.

Team Lokshahi News