मुंबई | भविष्यात चांगला परतावा मिळवून देणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीत जोखीम असतेच. इक्विटी मार्केटमध्ये मोठा परतावा मिळू शकतो परंतू जोखीम जास्त असल्याने अनेक गुंतवणूकदार त्याकडे पाठ दाखवतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल आणि जिथे परतावाही चांगला मिळेल, तर आज आम्ही आपल्याला (Saving Scheme) अशा एका पर्यायाविषयी सांगणार आहोत. जो नक्कीच भविष्यात तुम्हाला अगदी कमीत कमी गुंतवणुकीत मोठा परतावा देईल.

हा पर्याय म्हणजेत पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना. पोस्ट ऑफिसच्या बचत योजना सर्व भारतीयांसाठी कमी गुंतवणूकीत चांगला परतावा देणाऱ्या सर्वोत्तम पर्याय आहेत. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे आणि त्याच वेळी रिटर्नही चांगला मिळतो. पोस्ट ऑफिस Recurring Deposit हा त्यापैकी एक गुंतवणुकीचा (Post Office Saving Scheme) मार्ग आहे. चला तर जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर..

पोस्ट ऑफिस आरडीमध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी?

पोस्ट ऑफिस Recurring Deposit खाते ही गुंतवणूकीसाठी चांगली योजना आहे. या गुंतवणुकीत सरकारी सुरक्षेची हमी असते. यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांच्या छोट्या रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही, तुम्ही त्यात हवे तेवढे पैसे गुंतवू शकता.

या योजनेचे खाते पाच वर्षांसाठी उघडले जाते.  बँका सहा महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी आवर्ती ठेव खात्यांची सुविधा देतात. त्यात जमा केलेल्या पैशावर प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) व्याज मोजले जाते आणि प्रत्येक तिमाहीच्या शेवटी ते तुमच्या खात्यात (चक्रवाढ व्याजासह) जमा होते.

या योजनेतून व्याज किती मिळेल ते जाणून घ्या

आवर्ती ठेव योजनेवर 5.8% व्याज उपलब्ध आहे, हा नवीन दर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आला आहे. भारत सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित करते. जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8% दराने 16 लाखांपेक्षा जास्त रुपये मिळतील.

RD खात्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी

RD खात्यात नियमित पैसे जमा करत राहावे लागेल, जर नियमित पैसे जमा केले नाहीत तर दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल. 4 हप्ते चुकल्यानंतर खाते बंद केले जाईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हप्ता जमा करण्यास टाळाटाळ करू नये.

पोस्ट ऑफिस RD वरील टॅक्स

Recurring Deposit मधील गुंतवणुकीवर TDS कापला जातो, जर ठेव रु. 40,000 पेक्षा जास्त असेल तर 10% प्रतिवर्ष दराने कर आकारला जातो. RD वर मिळालेले व्याज देखील करपात्र आहे, परंतु संपूर्ण मॅच्युरिटी रकमेवर कर आकारला जात नाही. ज्या गुंतवणूकदारांना कोणतेही करपात्र उत्पन्न नाही ते FD प्रमाणेच फॉर्म 15G भरून TDS सूटचा दावा करू शकतात.