Categories: तंत्रज्ञान बातम्या सामाजिक

तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे का? ‘या’ सोप्या पध्दतीने करा खात्री..!

नवी दिल्ली | आधार नंबर सर्वच भारतीयांसाठी महत्वाचा झाला आहे. बऱ्याच ठिकाणी आधार नंबर आपल्या मोबाईल नंबर सोबत देखील लिंक करावा लागतो. परंतु बऱ्याचदा आपला मोबाईल नंबर बदलला असेल, एकापेक्षा अदिक नंबर आपण वापरत असू तर कोणता नंबर आधारशी लिंक आहे हे लवकर समजत नाही. अशा वेळी मोठी अडचण निर्माण होते. परंतु आता यामुळे होणारी अडचण टाळण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही सहज सोप्या युक्त्या सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या अडचणी दूर होऊन तुमचे काम झटक्यात पूर्ण होईल. 

यामाध्यमातून आपला  मोबाईल नंबर आधारशी जोडला गेला आहे की नाही हे देखील समजेल. आधारशी जोडलेला मोबाईल नंबर शोधण्यासाठी प्रथम आपल्याला uidai.gov.in  च्या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, My Aadhar वर आपल्याला Aadhar Services चा एक पर्याय दिसेल. याठिकाणी असलेल्या Verify Aadhar या पर्यायावर क्लिक करून माहिती भरावी लागेल.

 • Aadhar Services वरील आधार क्रमांक पडताळणे हा पर्याय निवडा.
 • त्यावर क्लिक करा. एक नवीन विंडो उघडेल. येथे आपण आपला किंवा आपण ज्याची माहिती तपासू पाहात आहात आणि खाली तपासू इच्छिता त्याचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
 • त्या खालील कॅप्चा कोड भरा. यानंतर पुढे जाण्यासाठी असलेल्या दुव्यावर क्लिक करा. यावर क्लिक करताच आधारची स्थिती दिसेल.
  • जर कोणताही नंबर आपल्या आधारशी लिंक केला नसेल तर तेथे काहीही दिसणार नाही.
  • एखादा मोबाईल नंबर आपल्या आधारशी कनेक्ट असेल तर त्या नंबरचे शेवटचे तीन अंक येथे दिसतील. तो नंबर आपल्या आधारशी लिंक असेल.

ओटीपी व्दारे मोबाईल क्रमांकासह आधार लिंक
मोबाईल ग्राहक त्यांचा नंबर आधारशी लिंक असल्याचे एसएमएस व्दारे पाहू शकतात आणि ओटीपीमार्फत पुन्हा सत्यापित करू शकतात. तथापि, केवळ तेच ग्राहक ज्यांचे मोबाईल नंबर आधीपासूनच त्यांच्या आधारशी लिंक केलेले आहेत. मोबाईल नंबर लिंक नसेल तर No record found चा मेसेज स्क्रिनवर दिसेल. 

 • आपल्या मोबाईल नंबरवरून 1947 वर SMS करा.
 • GVID<SPACE>Aadhaar-Number-last- 4-digits
 • GETOTP<SPACE>Aadhaar-NUMBER-last- 4-digits
 • वरील दोन्ही पर्यायांव्दारे आपल्या आधार नंबर मधील शेवटचे 4 अंक टाकून मोबाईल नंबर लिंक असल्याची खात्री होते.

आधार संबंधित कोणतीही माहिती जाणून घेण्यासाठी मोबाईल क्रमांकाचा वापर करून माहिती जाणून घ्या (खालील लिंक वर जा)
https://uidai.gov.in/my-aadhaar/avail-aadhaar-services/aadhaar-services-on-sms.html

ऑफलाईन मोड

 • आपल्या मोबाईल नेटवर्कच्या केंद्राकडे / स्टोअरवर जा.
 • आपल्या आधार कार्डची फोटो कॉपी घ्या.
 • तुमचा मोबाईल नंबर द्या.
 • आधार केंद्राच्या कर्मचाऱ्याला मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवावा लागेल.
 • ओटीपी कर्मचाऱ्यांना सत्यापित करण्यास सांगा.
 • आता कर्मचाऱ्यांना आपल्या बोटांचा ठसा द्या.
 • आपल्या मोबाईल नेटवर्कवरून आपल्याला एक पुष्टीकरण एसएमएस प्राप्त होईल.
 • ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “वाय” लिहून प्रत्युत्तर द्या.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: aadhar card download by name and date of birth aadhar card mobile number registration online link how to check if my mobile number is linked to aadhar card how to link aadhaar with mobile number by sms how to link my mobile number with aadhar how to register mobile number in aadhar card online uidai verify aadhar