Categories: Featured

जम्मू-काश्मीरला सरकारकडून नवीन वर्षाची भेट..!

श्रीनगर।१ जानेवारी।जम्मू-काश्मीरला सरकारकडून नवीन वर्षाची भेट देण्यात आलीय. सरकारने तब्बल पाच महिन्यांनंतर येथे सर्व मोबाइल फोनवर एसएमएस सेवा सुरू केलीय. रुग्णालयांतही ब्रॉडब्रँड इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून एसएमएस सेवा सुरु झाली आहे. जम्मूमध्ये मोबाइल इंटरनेटशिवाय इतर सेवा सुरु करण्यात आली होती. परंतु, काश्मीरमध्ये लँडलाइन आणि पोस्टपेड सेवा टप्प्याटप्याने देण्यात आली. 

जम्मू-काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कन्सल म्हणाले की, सर्व सरकारी रुग्णालयात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा आणि सर्व मोबाइल फोनवर पूर्णपणे एसएमएस सेवा बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. काश्मीरमध्ये अजून मोबाइलवर इंटरनेट आणि प्रीपेड मोबाइल सेवा सुरु करण्यात आलेली नाही.

इंटरनेट सेवा कधी सुरु करायची याचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे कन्सल यांनी सांगितले. हा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा आहे. स्थिती सुधारल्यानंतर लवकरच ही सेवा देखील सुरु केली जाईल. टप्प्याटप्याने सर्व सरकारी रुग्णालये आणि शाळांमध्ये इंटरनेट सेवा सुरु केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: जम्मू काश्मीर श्रीनगर