जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!

मुंबई | जवाहर नवोदय विद्यालयाच्या २०२२-२३ प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. १५ डिसेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. या संधीचा फायदा पाचवी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहावीच्या वर्गातील प्रवेशासाठी घेण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या परिक्षेसाठी आवश्यक असणारा अर्ज विनामुल्य जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. घरबसल्या मोबाईलवरून देखील हा अर्ज डाऊनलोड करता येतो. तसेच सायबर कॅफे, आपले सरकार सेवा केंद्र याठिकाणी देखील हा अर्ज उपलब्ध होईल. जवाहर नवोदय प्रवेश प्रक्रिया या शब्दांवर क्लिक केल्यास आपल्याला थेट नवोदय विद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवरील प्रवेश अर्जासाठी कनेक्ट केले जाईल. 

प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावरील Enrolment-Policy या लिंकवर पहावे. मराठी मधून संपूर्ण प्रवेश प्रक्रिया जाणून घेण्यासाठी “जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी २०२२ माहितीपत्रक पहावे. तर सहावी इयत्तेच्या रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करावे.