Categories: Featured राजकीय

जितेंद्र आव्हाडांचे लहानपणीच्या पत्त्यासहीत शरद पवारांसाठी खास ‘ट्विट’

मुंबई। ५ डिसेंबर। महाविकास आघाडी सरकारचं रखडलेलं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे. या खातेवाटपानंतर आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खास आभार मानले आहेत. एकेकाळी चाळीत राहणारा आता चाळीचा निर्माण करणार, हे फक्त पवार साहेबच करु शकतात, अशा शब्दात आव्हाडांनी शरद पवार यांच्याबद्द्ल आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Team Lokshahi News