Categories: राजकीय

पंतप्रधान मोदी ‘या’ क्रुर शासकाचा अवतार – जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

औरंगाबाद।२७ डिसेंबर। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिटलरचा अवतार असल्याचा गंभीर आरोप केलाय. ते म्हणाले, “१९३५ साली हिटलरने देखील असाच नागरिकत्व कायदा आणला होता. त्यानंतर कोट्यवधी ज्यू नागरिकांना मारलं गेलं. मोदींनी आता तोच कायदा आणला आहे. मोदी थेट हिटलरचा अवतार आहे. ”आज मोदी दंगेखोरांना असं करु, तसं करू असा इशारा देत आहेत. मात्र त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही हत्यार न घेता इंग्रजांना पळवून लावलं होतं”.

त्याचबरोबर सध्याच्या काळात मुली देखील बापाला आपला मोबाईल दाखवत नाही. दुसरीकडे मोदी मात्र आपलं सगळं पाहायला लागले आहेत, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला. मोदींना दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहायला खूप आवडतं. आता मुलगी सुद्धा आपल्या बापाला आपला मोबाईल दाखवत नाही, तर मग माझ्या व्यक्तिगत आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार मोदींना कुणी दिला?”

ही सगळी परिस्थिती पाहून, स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू झाली आहे, असं वाटतं. ही लढाई मुस्लिमांची नाही. हा फक्त मुस्लिमांचा प्रश्न आहे असं दाखवून हिंदूना गाफील ठेवलं जातंय. हा देश कुणाच्या बापाचा नाही. आसाममध्ये १४ लाख हिंदू पकडले गेले. हिंदूंमध्ये ६७०० जाती अशा आहेत ज्यांच्याकडे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी एकही दाखला देण्याची स्थिती नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या दोन्ही कायद्यांविरोधातील ही लढाई आंबेडकरी विचारधारा जीवंत राहणार की गोळवलकरांचे विचार जीवंत राहणार हे ठरवेल. सध्या मनुस्मृतीला जीवंत करणाऱ्या गोळवलकरांचे सुवर्ण दिवस आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Team Lokshahi News