Categories: राजकीय

जितेंद्र आव्हाडांनी मला वारसा सांगण्याची गरज नाही – शिवेंद्रराजे गरजले

सातारा।३१ जुलै। मला जितेंद्र आव्हाडांना फारसं महत्व द्यावसं वाटत नाही अशा शब्दात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आव्हाडांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार शिवेंद्र राजे यांच्या भाजप प्रवेशावरून त्यांच्यावर टीका केली होती, त्याला प्रत्युतर देताना शिवेंद्रराजेंनी हे वक्तव्य केले आहे. 

यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले, मी इतकी वर्षे बरोबर होतो तेव्हा जितेंद्र आव्हाडांना माझा वारसा कळला नाही. भडक बोलण्याने माणूस शहाणा असतो असं नाही, त्यामुळे मला जितेंद्र आव्हाडांनी किंवा कुणीही माझा वारसा सांगण्याची गरज नाही. 

आमदार शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्ते आणि मतदारसंघातील लोकांच्या विकासासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. असे असले तरी अनेकांना शिवेंद्रराजेंसारख्या पुरोगामी नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करणे रूचलेले नाही. जितेंद्र आव्हाड यांनी देखील हाचा धागा पकडून शिवेंद्रराजेंवर टिका केली होती.

Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: अजित पवार आमदार शिवेंद्रराजे भोसले कॉंग्रेस छत्रपती उदयनराजे भोसले जितेंद्र आव्हाड भाजप राष्ट्रवादी विधानसभा २०१९ शरद पवार सातारा सेना