मुंबई | इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस अर्थात आयटीबीपीमध्ये (ITBP) कॉन्स्टेबल (कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) पदांच्या भरतीसाठी (ITBP Constable Recruitment 2022) अर्ज मागवले आहेत. या भरतीच्या माध्यमातून 248 पदे भरली जाणार आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झालेली असून 7 जुलै 2022 पर्यंत अर्ज करता येईल.

एकूण 248 पदांपैकी 90 पदांवर ITBP मध्ये आधीच कार्यरत असलेल्या उमेदवारांची भरती केली जाईल. उर्वरित 158 जागांसाठी उमेदवार थेट अर्ज करू शकतील. 158 पदांमध्ये 135 पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत, तर महिला उमेदवारांसाठी 23 पदे आहेत. यासोबतच 158 पदांपैकी 65 पदे अनारक्षित असून 26 पदे अनुसूचित जाती (SC), 23 पदे अनुसूचित जमाती (ST), 28 पदे ओबीसी (OBC) आणि 16 पदे EWS प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असावी. यासोबतच एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात पाच वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट असेल.

शैक्षणिक पात्रता
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 12वी पास असणे आवश्यक आहे. यासोबतच 35 शब्द प्रति मिनिट या वेगाने इंग्रजी टायपिंग किंवा 30 शब्द प्रति मिनिट या वेगाने हिंदी टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

पगार
परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रुपये पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये पीईटी, पीएसटी, लेखी चाचणी, कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय चाचणी यांचा समावेश असेल.