TRAI मध्ये सल्लागार पदासाठी नोकरीच्या संधी; मिळणार दिड लाखापर्यंत पगार

नवी दिल्ली | टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने (TRAI) ने सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, यंग फ्रोफेशनल आणि सल्लागार पदासाठी भरती (Job Opening) सुरू केली आहे. या भरतीसाठी ट्रायच्या https://www.trai.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. ट्रायने ही पदे भरण्यासाठी दोन जाहिराती (Advertisment) प्रसिद्ध केल्या आहेत.

सल्लागार, वरिष्ठ सल्लागार आणि यंग प्रोफेशनल पदासाठी जागा असल्याची नोटिस दिली आहे. अर्ज करण्याची शेवटी तारीख २७ जानेवारी २०२२ आहे. तर, दुसरी जाहिरात सल्लागार(Advisor) पदांसाठी आहेत. यासाठी ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करायचे आहेत. सल्लागार पदासाठी दिल्लीच्या मुख्यालयात नियुक्ती केली जाणार आहे. प्रतिनियुक्तीवर ही नियुक्ती असणार आहे.

सल्लागार नॉन टेक्निकल ग्रेड II (आर्थिक विश्लेषण विभाग) १ पद
पगार- ६५,००० रूपये महिना
वयोमर्यादा- उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असावे
शैक्षणिक योग्यता आणि अनुभव – कॉमर्स शाखेत मास्टर्स किंवा बॅचलर डिग्री आवश्यक.
नोकरीचा १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

सल्लागार आंतरराष्ट्रीय संबंध विभागासाठी १ पद
पगार- ६५ हजार रुपये महिना
वयोमर्यादा- उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असावे
शैक्षणिक योग्यता – उमेदवार किमान ग्रेज्युएट असला पाहिजे.

सिनियर कंसल्टंट फायनांशियल आणि इकोनॉमिक्स एनेलिसिस डिव्हिजन- १ पद
पगार- दर महिना १,५०,००० रूपये
वयोमर्यादा- ६५ वर्ष
शैक्षणिक योग्यता – सीए/आईसीडब्लूए/कॉस्ट किंवा मॅनेजमेंच अकाउंट्स क्षेत्रातील तज्ज्ञ,
कमीत कमी २० वर्षांचा अनूभव अपेक्षित.

वरिष्ठ सल्लागार ब्रॉडकास्ट आणि केबल सेवा – १ पद
पगार- १,५०,००० रूपये दर महिना
वय- ६५
शैक्षणिक पात्रता – बिझनेस एडमिनिस्ट्रेशन / अर्थशास्त्र/ वाणिज्य/ अभियांत्रिकी/ विज्ञान/ कायद्यातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.

सल्लागार (टेक) ग्रेड I – १ पद
पगार- ८० हजार रुपये दरमहा
वयोमर्यादा- कमाल ४५ वर्षे
शैक्षणिक पात्रता- पदवीधर असणे आवश्यक आहे.

यंग प्रोफेशनल – १ पद
पगार- ६५,००० रुपये दरमहा
वयोमर्यादा- कमाल वय ३२ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे.
शैक्षणिक पात्रता- तंत्रज्ञानातील मास्टर्स/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग इन कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/ टेलिकॉममध्ये किमान तीन वर्षांचा अनुभव.

TRAI भरतीसाठी अर्ज भरून तो आवश्यक कागदपत्रांसह विहित पत्त्यावर पाठवा. कृपया लिफाफ्यावर पोस्टचे नाव लिहा. अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे – वरिष्ठ संशोधन अधिकारी (A&P)- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, महानगर दरवाजा संचार भवन, जवाहरलाल नेहरू मार्ग (जुना मिंटो रोड), झाकीर हुसेन कॉलेजच्या पुढे, नवी दिल्ली – 110002.

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)