Categories: नोकरी शिक्षण/करिअर

Amazon मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ४ तास काम करून मिळवू शकता ६० हजार पगार, तेही तुमच्या शहरात

नवी दिल्ली | जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने (Amazon) तरूणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. अॅमेझॉनने त्यांच्या कंपनीत तब्बल २० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यामुळे तुम्हाला नोकरीसाठी शहर सोडून बाहेर जाण्याचीही गरज भासणार नाही. तसेच अगदी कमीत कमी वेळ काम करून प्रतिमहिना ६०,००० ते ७०,००० हजार रूपये कमवण्याची संधी ही मिळणार आहे. 

स्वतःच्या शहरात मिळवू शकता नोकरी
अॅमेझॉन कंपनी सध्या डिलिव्हरी बॉय या पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. ही नोकरी साधी वाटत असली तरी या नोकरीतून तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता. बर्‍याच शहरांमध्ये या कंपनीचे सेंटर्स आहेत. त्यामुळे नोकरीसाठी तुम्हाला दुसऱ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही.

‘या’ ठिकाणी करा अॅप्लाय
अॅमेझॉनमधील नोकरीसाठी आपण अॅमेझॉनच्या https://logistics.amazon.in/applynow या साईटवर अर्ज करू शकता. किंवा कोणत्याही सेंटरमध्ये जाऊन अर्ज करू शकता.

किती तास करावं लागेल काम ?
डिलिव्हरी बॉयला दिवसभर काम करावं लागत नाही, त्यांना फक्त त्यांच्या क्षेत्रानुसार पॅकेजेस दिली जातात. डिलिव्हरी बॉय दिवसातून फक्त ४ तासात १०० ते १५० पॅकेज डिलीव्हरी करतात. प्रत्येक शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात तिथल्या ऑर्डरची संख्या कमी अधिक होते, त्यामुळे डिलिव्हरी बॉयला मिळणारी पॅकेजेस पण कमी अधिक होऊ शकतात.

या गोष्टींची असेल आवश्यकता
डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी तुमच्याकडे दहावी, बारावी किंवा डिग्री असणं आवश्यक आहे. शाळा किंवा महाविद्यालयातील पासिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे. डिलिव्हरीसाठी तुमच्याकडे स्वतःची बाईक किंवा स्कूटर असली पाहिजे. त्याचबरोबर दुचाकी किंवा स्कूटरचा विमा, आरसी हे वैध असणं आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स हे देखील फार महत्वाचं आहे.

किती मिळणार पगार?
डिलिव्हरी बॉयला दरमहा पगार १० ते १२ हजार पगार दिला जातो. तसेच प्रत्येक प्रॉडक्ट किंवा पॅकेजला १५ ते २० रुपये अधिकचे दिले जातात. डिलिव्हरी सर्व्हिस कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही एका महिन्यासाठी काम करत असाल आणि दररोज १०० पॅकेजेस जरी डिलिव्हरी केले तर तुम्ही सहज महिन्यात ६० हजार ते ७० हजार रुपये आरामात कमवू शकता.

Team Lokshahi News