मुंबई | भारतीय वायुसेना (IAF) ने वायुसेना रेकॉर्ड ऑफिसमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पद भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 21 मे पासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 जून 2022 आहे.

याशिवाय, उमेदवार https://indianairforce.nic.in/ या लिंकवर क्लिक करू पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/ या लिंकद्वारे, तुम्ही अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती (Indian Air Force Recruitment 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 4 पदे भरली जातील.

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, संगणकावर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग असणे आवश्यक आहे.

Indian Air Force Recruitment 2022 साठी वयोमर्यादा
1. OPEN 18-25 वर्ष
2. OBC 18-28 वर्ष
3. SC/ST 18 – 30 वर्ष