IT कंपनी Capgemini मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन अर्ज करावा लागणार

मुंबई | जगभरातील दिग्गज IT कंपनी Capgemini नं भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये पदभरतीची (Capgemini Recruitment 2022) घोषणा केली आहे. कॅपजेमिनी ही सल्लागार, तंत्रज्ञान, आउटसोर्सिंग सेवा आणि स्थानिक व्यावसायिक सेवा प्रदान करणाऱ्या जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. Capgemini नं इंजिनिअर्ससाठी (Capgemini Recruitment for Engineers) या भरतीची घोषणा केली आहे.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 2019 किंवा 2020 मध्ये पदवीधर झालं असणं आवश्यक आहे. MCA, BE/B.Tech, BE आणि B.Tech दोन्हीसाठी सर्व शाखांसाठी खुल्या आहेत. ME/M.Tech चे विद्यार्थी फक्त माहिती तंत्रज्ञान, माहिती विज्ञान, संगणक शास्त्रातून असले पाहिजेत. उमेदवारांना ME/M.Tech मध्ये 50% आणि त्याहून अधिक गुण मिळाले असणं आवश्यक आहे. शिक्षणादरम्यान उमेदवारांची एक वर्षांच्या वर गॅप नसणं आवश्यक आहे. दहावी, बारावी, पदवी आणि पोस्ट-ग्रॅज्युएशन यादरम्यान कोणतीही गॅप नसावी. बारावीला दोनदा उपस्थित झालेला उमेदवार, दोन्ही मार्कशीट उपलब्ध असल्यास विचारात घेण्यात येईल. BE/B.Tech पूर्ण करण्यासाठी उमेदवाराला 4 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला असू नये. तसेच उमेदवारांनी कोणत्याही शहरामध्ये नोकरीसाठी तयार असणं आवश्यक आहे.

उमेदवारांची निवड करण्यासाठी Technical Assessment Pseudo Code टेस्ट देणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर कम्युनिकेशन टेस्ट घेण्यात येईल. ही टेस्ट मल्टिपल चॉईस प्रश्नांच्या आधारे घेण्यात येणार आहे. यानंतर गेम बेस्ड aptitude टेस्ट घेण्यात येणार आहे. यानंतर उमेद्वारांची बेहेविअरल टेस्ट घेण्यात येणार आहे. आणि शेवटी उमेदवारांचा HR Interview घेण्यात येणार आहे.

या पदभरतीसाठी उमेदवारांनी 09 जानेवारी 2022 या तारखेच्या आधी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज करण्यासाठी https://www.capgemini.com/in-en/careers/capgemini-exceller-off-campus-drive-for-2019-2020-graduates/ या लिंकवर क्लिक करा.

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा Job Search टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)