मुंबई | महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Bharti 2022 Maharashtra) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण 3026 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण महाराष्ट्रात कुठेही आहे. 

महाराष्ट्र टपाल विभाग भरती 2022 करिता अर्ज शुल्क रु. 100 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 2 मे  2022 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
  • पद संख्या – 3026 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
    • भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 02 मे 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2022 
  •  अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in 
  • PDF जाहिरातhttps://cutt.ly/SGDwOHP
  • ऑनलाईन अर्ज कराhttps://indiapostgdsonline.gov.in