मुंबई | सध्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे. यामध्ये विविध बॅंका, सरकारी आस्थापनांचा समावेश आहे. आज आम्ही अशाच काही महत्वाच्या बॅंका आणि सरकारी आस्थापनांमधील नोकरीची माहिती देणार आहोत.

IDBI बँकेत 1544 पदांसाठी मेगाभरती

पोस्ट – अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए

  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर
  • एकूण जागा – 1 हजार 544 (यात अधिकारी पदासाठी 1 हजार 44, सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए पदासाठी 500 जागा आहेत.
  • वयोमर्यादा – अधिकारी पदासाठी  20 ते 25 वर्ष, सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 21 ते 28 वर्ष.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2022
  • तपशील – www.idbibank.in  (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. Current openings वर क्लिक करा. Recruitment of Executives यात detailed advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

इंडियन ओवरसीज बँकेत (IOB) सुरक्षारक्षक पदांसाठी भरती

पोस्ट – सुरक्षा रक्षक

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
  • एकूण जागा – 20
  • वयोमर्यादा – 18 ते 26 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
  • तपशील  – www.iob.in   (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. View करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

पुणे महानगरपालिका इंटर्न पदाच्या 330 जागांसाठी भरती

  • पोस्ट – इंटर्न (यात कायदेशीर इंटर्न, अभियांत्रिकी इंटर्न-इलेक्ट्रिकल, अभियांत्रिकी इंटर्न-सिव्हिल, अभियांत्रिकी इंटर्न-पर्यावरण, B.Sc (पर्यावरण), अभियांत्रिकी इंटर्न-इन्स्ट्रुमेंटेशन, अभियांत्रिकी इंटर्न-कॉम्प्युटर/IT, कंटेन्ट निर्माता, इंटर्न हॉर्टीकल्चर, इंटर्न B.VSc. AH, इंटर्न M.Sc. जीवशास्त्र/प्राणीशास्त्र, पदवीधर इंटर्न-B.Com, पदवीधर इंटर्न-लघुलेखक) या पदांचा समावेश आहे.

या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात पदवीधर असणे गरजेचे आहे.
एकूण जागा – 330 (यात कायदेशीर इंटर्नसाठी 2 जागा, अभियांत्रिकी इंटर्न-इलेक्ट्रिकलसाठी 15 जागा, अभियांत्रिकी इंटर्न-सिव्हिलसाठी 212 जागा, अभियांत्रिकी इंटर्न-पर्यावरणसाठी दोन जागा, B.Sc (पर्यावरण)साठी 1, अभियांत्रिकी इंटर्न-इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 2 जागा, अभियांत्रिकी इंटर्न-कॉम्प्युटर/IT साठी 12 जागा, कंटेन्ट निर्मातासाठी 6 जागा, इंटर्न हॉर्टीकल्चरसाठी 44 जागा, इंटर्न B.VSc. AH साठी 2 जागा, इंटर्न M.Sc. जीवशास्त्र/प्राणीशास्त्रसाठी 5 जागा, पदवीधर इंटर्न-B.Com साठी 23 जागा, पदवीधर इंटर्न-लघुलेखकसाठी 4 जागा आहेत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
तपशील – www.pmc.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर pmc मध्ये recruitment मध्ये all recruitments related यावर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल. फाईल डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)