चंद्रपूर | वन विभाग चंद्रपूर (Forest Department – Maha Forest Chandrapur) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Chandrapur Van Vibhag Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, कंपाउंडर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate / MVSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे 

कंपाउंडर (Compounder) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी HSC and Diploma Livestock Supervisor पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे

पगार
1. पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) – 40,000/- रुपये प्रतिमहिना
2. कंपाउंडर (Compounder) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठी पत्ता
विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर रामबाग वनवसाहत परिसर (वनविश्रामगृह जवळ) माता मंदिर मुल, रोड चंद्रपूर 442401 / dfochandrapur@gmail.com

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahaforest.gov.in/ या लिंकवर क्लिक करा