मुंबई | भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये नोकरीची मोठी संधी आहे. कनिष्ठ कार्यकारी, हवाई वाहतूक नियंत्रण (Junior Executive, Air Traffic Control) या पदांच्या भरतीसाठी Airports Authority of India, AAI ने  अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट aai.aero वर जाऊन अर्ज करू शकता.

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जून 2022 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2022 पर्यंत चालेल. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 400 हून अधिक पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 15 जून 2022
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2022

भरती प्रक्रियेतील रिक्त जागांचा तपशील

  • ज्युनियर एग्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल) : 400

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून भौतिकशास्त्र आणि गणितासह B.Sc किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला 10+2 स्तरावर बोललं आणि लिहिल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेच किमान प्रवीणता असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची 14.07.2022 रोजी कमाल वयोमर्यादा 27 वर्ष असावी. मात्र, शासनाच्या नियमानुसार, वयात सवलत दिली जाईल.

वेतनश्रेणी

  • कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी निवडल्या जाणाऱ्या अर्जदारांना 40000 ते 140000 रुपये वेतन दिले जाईल.